जंक्शन : पुढारी वृत्तसेवा : भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे उस तोडणी मजूर व्यसन करतो आणि ऊस तोडणी वेळेवर करीत नसल्याच्या कारणावरुन ऊस वाहतूकदार मालकाच्या मारहाणीत मजुराचा मृत्यू झाला. गणेश मधुकर लोखंडे (वय ३०, रा. बरकतपूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी टोळीमालक अमोल हनुमंत माने (रा. कात्रज, ता. करमाळा. जि. सोलापर) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. गणेशची पत्नी अलका लोखंडे (वय २३) हिने या प्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरणेवाडी गावच्या परिसरातील उस तोडणीचे काम सुरु होते. गुरुवारी (दि. २४) दुपारी अमोल माने याने गणेश लोखंडे हा व्यसनाच्या आहारी गेला आहे. यामुळे ऊस तोडणी करीत नसल्याचा कारणावरुन उसाने मारहाण केली होती. गंभीर मार लागल्यामुळे त्याला उपचारासाठी शुक्रवारी (दि. २५) पहाटे लासुर्णेमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी अमोल माने याच्यावर शुक्रवारी रात्री उशीराने खुनाचा गुन्हा दाखल केला. माने याला पोलिसांनी रात्री उशीराने अटक करण्यात आली असून, तपास वालचंदलनगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे करीत आहेत.
हेही वाचलंत का?