RRR Collection Day 1 : राजामौलीच्या RRR ची दमदार सुरुवात; पण पहिल्या दिवशी तोडू शकला नाही ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड

RRR Movie
RRR Movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

दाक्षिणात्य प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा चित्रपट 'आरआरआर' (RRR Movie) काल शुक्रवारी (दि.२५) पडद्यावर झळकला. पहिल्या दिवशी 'आरआरआर' चित्रपट 'बाहुबली २'च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचा रेकॉर्ड तोडू शकला नाही. पण पुढील काही दिवसांत हा चित्रपट मोठी कमाई करु शकतो, असे चित्रपट समीक्षकांचे म्हणणे आहे.

प्राथमिक अंदाजानुसार 'आरआरआर'ने हिंदी पट्ट्यात १८ कोटींची कमाई असल्याची माहिती समोर आली आहे. 'सूर्यवंशी' चित्रपटानंतर हे दुसरे सर्वांत मोठे हे ओपनिंग आहे. 'सूर्यवंशी'ने ओपनिंगला २६ कोटी, '८३' ने १२ कोटी आणि 'बाहुबली २'ने हिंदीत ४१ कोटींची कमाई केली होती. पण 'RRR'ने '८३', 'तानाजी' आणि 'गुड न्यूज'च्या पहिल्या दिवशीच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. 'RRR'ला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या बिग बजेट चित्रपटाची देश-विदेशात मोठी चर्चा आहे. विशेषत: अमेरिकेत चित्रपटाने 'अभूतपूर्व' सुरुवात केली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक (Film trade analyst) तरण आदर्श यांनी चित्रपटाचे विदेशातील पहिल्या दिवशीच्या कलेक्शनचे आकडे ट्विटद्वारे शेअर केले आहेत. 'RRR'ला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. #RRR ने ऑस्ट्रेलियामध्ये #TheBatman ला ओव्हरटेक केले आहे. #RRR ने ऑस्ट्रेलियात पहिल्या दिवशी ४.०३ कोटी, न्यूझीलंडमध्ये ३७ लाखांची कमाई केली आहे. अमेरिकेत ५० लाख डॉलर्सचा टप्पा पार केला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, #RRR ची पहिल्या दिवशीची तेलुगू भाषिक पट्ट्यातील कमाई १०० कोटींपेक्षा पेक्षा अधिक असू शकते. भारतातील हिंदी पट्ट्यातील चित्रपटाच्या कलेक्शनची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. पण दक्षिणेकडील राज्यांमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनचा प्राथमिक अंदाज आशादायक दिसत आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील अन्नपूर्णा सिनेमागृहाच्या खिडक्या फोडण्याची घटना घडली आहे. तांत्रिक कारणामुळे येथे आरआरआर चित्रपट थोडा उशीरा सुरू करण्यात आला होता. त्यामुळे प्रेक्षकांनी सिनेमागृहाच्या खिडक्या फोडल्या. अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

एस एस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'RRR' सिनेमागृहांमध्ये काल देशभरात प्रदर्शित झाला. दक्षिणेतील प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. चित्रपट सुरू होण्यापूर्वीच प्रचंड लोक थिएटरच्या बाहेर जमून जयघोष करत होते. तर काहींनी अभिनेता रामचरणच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. याचे व्हिडिओही ट्विटर व्हायरल झालेत. अनेक दिवसांपासून आरआरआर या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेता रामचरण, आलिया भट्ट, एनटीआर ज्युनिअर, अजय देवगण यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news