पुणे : शिवे येथील भामा आसखेड धरणात बुडून दोघांचा मृत्यू : मृतांमध्ये तरुणीचा समावेश

पुणे : शिवे येथील भामा आसखेड धरणात बुडून दोघांचा मृत्यू : मृतांमध्ये तरुणीचा समावेश

चाकण, पुढारी वृत्तसेवा: भामा आसखेड धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणीसह दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवे (ता. खेड) येथे शुक्रवारी सायंकाळी 4 वाजणाच्या सुमारास ही घटना घडली आहे. जवळपास तासाभराच्या शोधकार्यानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यास पोलिस, स्थानिक कार्यकर्ते आणि संस्थांना यश आले आहे.

रोहन संजय रोकडे (वय २४) व प्राजक्ता देविदास पवार (वय २० , रा. बिरदवडी, ता. खेड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरदवडी येथील कुटुंबीय व नातेवाईक एकत्रितपणे शिवे गावच्या हद्दीतील भामा आसखेड धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्यातील चार जण पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील दोघे सहीसलामत बाहेर आले. मात्र, रोहन आणि प्राजक्ता यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि चाकण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिकांच्या मदतीने सुरुवातीला एक मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. तर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या मदतीने दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. चाकण पोलिस स्‍थानकात मृत्यूची नोंद रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेने बिरदवडी गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news