पुणे : यवतमध्ये ४ गावठी पिस्टल, १ रिव्हॉल्वर आणि १३ जिवंत काडतुसे जप्त, ५ जणांची टोळी जेरबंद | पुढारी

पुणे : यवतमध्ये ४ गावठी पिस्टल, १ रिव्हॉल्वर आणि १३ जिवंत काडतुसे जप्त, ५ जणांची टोळी जेरबंद

यवत : पुढारी वृत्तसेवा

राहू (ता. दौंड ) येथून ४ गावठी पिस्टल, १ रिव्हॉल्वर व १३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कामगिरी यवतच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा केली. याबाबत यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने पाच संशयिताकडून ४ गावठी पिस्टल, १ रिव्हॉल्हर, १३ जिवंत काडतुसे, ४ मोबाईल फोन असा एकूण २ लाख ९१ हजार ३०० रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

यवत पोलीस स्टेशन हददीत सोसायटी निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांवर कारवाई करणेबाबत यवत पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक राहू परिसरात पेट्रोलिंग करीत होते. पोलीस हवालदार निलेश कदम व गुरूनाथ गायकवाड यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, राहू गावातील महात्मा फुले चौकात दिनेश महादेव मोरे (रा. राहु, ता. दौड) व अभिषेक उर्फ बारकू राजेंद्र शिंदे व त्यांचे इतर तीन साथीदार हे बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगून आहेत. त्यामुळे यवत पोलीस स्टेशन पथकाने या ठिकाणी जावून दिनेश महादेव मोरे (वय २३, रा. राहू, ता. दौड), अभिषेक उर्फ बारकू राजेंद्र शिंदे (वय २०, रा. भांडवाडी महात्मा फुले चौक राहू, ता. दौड), अमोल शिवाजी नवले (वय ३०, रा. कुंबडमळा सहकारनगर राहु, ता. दौड), सचिन शिवाजी चव्हाण (वय २३ , रा. मारूती मंदिरामागे राहू, ता. दौड) आणि परमेश्वर दथरथ कंधारे (वय २३ , सध्या रा. भांडवाडी राहू, ता. दौड, मूळ रा. वडीपुरी, ता. लोहा, जि. नांदेड) यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता. यावेळी त्यांच्याकडे ४ गावठी पिस्टल, १ रिव्हॉल्हर, १३ जिवंत काडतुसे, ४ मोबाईल फोन असा एकुण २,९१,३०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

या संशयितांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात विविध कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार निलेश कदम, पोलीस हवालदार गुरूनाथ गायकवाड, संतोष कदम, रामदास जगताप, रविंद्र गोसावी, अजित काळे, प्रमोद गायकवाड अजिक्य दौडकर यांच्या पथकाने केली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : युद्ध युक्रेनमध्ये पण फोडणी महागली भारतात | Russia- Ukraine War

Back to top button