सातारा : कास पुष्प पठारावरील कुंपणाचा रानगव्याला अडसर | पुढारी

सातारा : कास पुष्प पठारावरील कुंपणाचा रानगव्याला अडसर

बामणोली, पुढारी वृत्तसेवा : जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांच्या संरक्षणासाठी कंपाऊंड करण्यात आले आहे. परंतु ते आता वन्यप्राण्यांना अडसर  ठरू लागले आहे. शुक्रवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास कास पुष्प पठारावर एक रानगवा चरत पठारावरील डांबरी रस्त्यावर आला होता. बराच वेळ हा रानगवा रस्त्यावर होता.

मात्र, रस्‍त्‍याच्या दोन्ही बाजूला फुलांच्या संरक्षणासाठी असलेले कंपाउंडमुळे या रानगव्याला जंगलात जाता आले नाही. जवळपास अर्धा तासहून अधिक काळ हा रानगवा जंगलात जाण्यासाठी धडपड करत होता. परंतु दोन्ही बाजूला असलेले कंपाऊंड त्याला अडसर ठरत होते.

कास पठारावरून सातारा बामणोलीकडील फुलांच्या संरक्षणासाठी असलेले कंपाऊंड वन्यप्राण्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. सदरचे कंपाऊंड हे फुलांच्या हंगाम कालावधी पुरते मर्यादित असावे, असे मत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केले जात आहे. अनेक वन्य प्राण्यांचा मुक्त संचार हा या कंपाउंडमुळे थांबला जात आहे. त्यामुळे सदरचे कंपाउंड हे जसे फुलांच्या संरक्षणासाठी आहे, परंतु ते वन्यप्राण्यांच्या ये-जा करण्यास अडथळा ठरत आहे.

रानगवा,सांबर,भेकर,रान डुक्कर अशा प्राण्यांना या कंपाउंडमुळे रस्‍त्‍याच्या अलीकडे पलीकडे जाता येत नाही. त्‍यामूळे कास पठारावर आलेले रानगवा हा रस्त्यावर येत आहेत. तसेच वन्यप्राणी रात्रीच्या वेळेस पठारावर येतात व त्यांना अलीकडे पलीकडे जाता न आल्याने या भागात वाहन चालकांची शिकार होती. त्‍यामूळे वनविभागाने कास पुष्प पठारावरील कंपाउंड बाबत निर्णय लवकरात लवकर घ्‍यावा असे पर्यावरण प्रेमींनी मागणी केली आहे.

हेही वाचा  

Back to top button