कर्नाटक अर्थसंकल्प : बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासाठी 927 कोटी

कर्नाटक अर्थसंकल्प : बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासाठी 927 कोटी

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातील असल्याने बेळगाव जिल्ह्याकडे विशेष लक्ष देतील अशी अपेक्षा केली जात होती. पण, मागील काही योजनांसाठी निधी राखीव ठेवला. ठोस योजना किंवा मोठ्या तरतुदीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले. बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वेमार्गासाठी 927 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जाहीर केले. अथणीमध्ये कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. वादग्रस्त आणि प्रलंबित कळसा-भांडुरा योजनेसाठी हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. इंजिनिअरिंग संशोधनासाठी बेळगावातील ग्लोबल इमर्जिंग टेक्नॉलॉजी डिझाईन सेंटरसाठी 150 कोटींचे अनुदान राखीव ठेवण्यात आले आहे.

बेळगावात किडवाई प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली. यासाठी 50 कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे. बेळगाव-शहापूर (जि. यादगिरी)सह इळकल येथील साड्यांसाठी मायक्रो क्‍लस्टर स्थापन करण्यात येणार आहे. बेळगावसह सर्वच जिल्ह्यांमध्ये मिनी फूड पार्क सुरू करण्यात येणार आहेत. बेळगावातील हिंडलगा कारागृहासह सर्वच जिल्ह्यांतील कारागृहांमध्ये मोबाईल जामर बसवण्याची घोषणाही मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली आहे.

बेळगाव तालुक्यातील किणये डॅमचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी निधी राखीव ठेवला जाणार आहे. बेळगावसह धारवाड, हावेरी, दावणगिरी, चित्रदुर्गमध्ये उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी येणारे पोलिस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना बरॅक निर्माण केले जाणार आहे. हिडकल धरण प्रदेशाचा पर्यटन स्थळ म्हणूक विकास केला जाणार आहे. खानापूर तालुक्यातील जांबोटी येथे मोठ्या प्रमाणात मधाचे उत्पादन घेतले जाते. या मधाला ब्रँड मिळवून देण्यात येणार आहे. बेळगावसह हुबळी-धारवाड, गुलबर्गा, मंगळूर आणि म्हैसूरमध्ये प्रत्येकी 250 कोटी रुपये खर्चून विद्यार्थ्यांसाठी बहुमजली हॉस्टेल निर्माण करण्यात येणार आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news