पुणे : चारीत्र्याच्या संशयातून पत्नीचा घोटला गळा | पुढारी

पुणे : चारीत्र्याच्या संशयातून पत्नीचा घोटला गळा

पुणे : पुढारी वृत्तेसवा

चारीत्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला मारहाण करत हाताने गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी रात्री लोणकर शाळेच्या मागे वडगावशेरी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसानी आरोपी पती किशन उर्फ कृष्णाप्पा तुळप्पा चव्हाण (वय. 42, रा. लोणकर शाळेच्या मागे वडगावशेरी) याला अटक केली आहे. तर सिताम्मा किशन उर्फ कृष्णप्पा चव्हाण (वय. 35) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत जगन्नाथ होनबा राठोड (वय. 41, रा. मांजरी हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किशन चव्हाण याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Winter Paralympics 2022 : आता रशिया सोबत बेलारुसला दणका, बिजिंग पॅरालिम्पिकमध्ये खेळाडूंवर घातली बंदी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशन चव्हाण हा पत्नी सिताम्मा हिच्यासोबत वडागावशेरी लोणकर शाळेच्या मागे बसथांब्याजवळील बाळासाहेब चांदेरे यांच्या मोकळ्या जागेतील प्लॉटमध्ये राहत होता. दोघेही मुळचे कर्नाटक येथील असून बिगारी काम करतात. किशन पत्नी सिताम्मा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून दोघांत वाद होते होते. बुधवारी रात्री दोघांत वाद झाले होते. त्यावेळी किशन याने सिताम्मा हिला मारहाण करून हाताने गळा आवळला.

नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ

वादाच्या आवाजाने शेजारील नागरिक जमा झाले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला तत्काळ अटक केली. सिताम्माला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगिलतले.

हेही वाचा

जुन्या वाहनांवर फिटनेस प्रमाणपत्र लावणे बंधनकारक

राजकीय पक्षांवरील कारवाईची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

War Refugees : सात दिवसांमध्‍ये युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिक निर्वासित

Back to top button