पुणे : निवडणूक प्रमुखावरून सत्ताधारी भाजपमध्ये धुसफुस ! | पुढारी

पुणे : निवडणूक प्रमुखावरून सत्ताधारी भाजपमध्ये धुसफुस !

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिका निवडणूक प्रमुख पदी संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची निवडणूक प्रमुख म्हणून घोषणा केल्यानंतर अवघ्या 24 तासात शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक होणार असल्याचे पत्रक प्रदेशाध्यक्षांच्या नावाखाली शनिवारी निघाले. त्यामुळे महापालिका निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली लढविणार यावरून सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

Russia vs Ukraine : बेलारुसची रशियाला साथ, युक्रेनविरोधात सैनिक उतरविणार

गत आठवड्यात शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून राजेश पांडे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर शनिवारी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत पांडे आणि मुळीक या दोघांचाही सत्कार करण्यात आला. तसेच मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होईल आणि भाजपचे शंभर पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील असेही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले.

Russia-Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचं जगातील सर्वात मोठं कार्गो विमान जळून खाक, नेमकं कसं झालं नष्ट?

दरम्यान, या कार्यक्रमानंतर मुळीक यांच्या प्रसिद्धीचे काम पाहणाऱ्या व्यवस्थेकडून शहराध्यक्ष मुळीक यांच्या अध्यक्षतेखालीच महापालिका निवडणूक होईल असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जाहीर केल्याचे पत्रक प्रसिद्ध झाले. संपूर्ण बैठकीचे केवळ एवढेच पत्रक निघाल्याने महापालिका निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली लढवयाच्या यावरून भाजपमध्ये धुसफूस सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पांडे हेच निवडणूक प्रमुख असतील असे प्रदेशाध्यक्षा मार्फत स्पष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा

रशिया- युक्रेन युद्धाचा फटका; गॅस सिलिंडरचे दर हजार रुपयांच्या पुढे जाणार?

युद्धामुळे देशात महागाई वाढणार ; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे संकेत

युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण

Back to top button