

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या मदतीने औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दूध उत्पादक संघाच्या उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे गोकुलसिंग राजपूत, संदीप बोरसे आणि शिवसेनेचे दिलीप निरफळ यांचे अर्ज आहेत. भाजपला अध्यक्षपद देण्यात महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
शिवसेनेचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे हे आपले समर्थक नंदलाल काळे यांना अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पद मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांचा अध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्याची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी संदिपान भुमरे दूध संघ कार्यालयातून निघून गेले.
औरंगाबाद जिल्हा जिल्हा दूध संघाच्या १४ जागांसाठी २२ जानेवारी २०२२ रोजी निवडणूक झाली होती. उपाध्यक्ष पदासाठी अर्ज मागे घेण्याची मुदत शनिवारी (दि. ५) रोजी दुपारी साडे बारा वाजेपर्यंत आहे.
हेही वाचलंत का?