अजून एक आठवडा तरी पुण्यातील शाळा, महाविद्यालये सुरू होणार नाहीत : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

अजून एक आठवडा तरी पुण्यातील शाळा, महाविद्यालये सुरू होणार नाहीत : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे; पुढारी वृत्‍तसेवा 

कोरोना आपल्यात वाढू नये यासाठीच निर्णय घेत असतो. सर्वाना विचारात घेऊन निर्णय घेतले जात असतात. ७३ हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कालची एका दिवसातील आकडेवारी १६ हजार इतकी आहे. अजून किमान आठ दिवस तरी पुण्यात लाट कमी होणार नाही. पुण्याचा कोरोना दर २७ टक्के आहे. यामुळे अजून एक आठवडा तरी पुण्यातील शाळा, महाविद्यालये सुरू होणार नाहीत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्‍यांनी कोरोना रूग्‍णांची संख्या वाढत असली, तरी हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. सर्व बेड आहेत, पण रुग्ण ॲडमिट नाहीत, सगळे हॉस्पिटलमध्ये बेड खाली आहेत, रुग्णांना कोणताही त्रास होऊ देणार नाही. खासगी हॉस्पिटलच्या तक्रारी येत आहेत. कोणाला त्रास होऊ देणार नाही. लसीकरणाबाबत गांभीर्याने घेत आहोत. जिल्हयात १ कोटी ६० लाखापर्यंत डोस झाले आहेत. ग्रामीण भागात ७५ टक्के अन पुणे अन् पिंपरीत ५१ टक्के लसीकरण झाल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.

६० वर्षांवरील व्यक्तीला बुस्टर डोस देण्याचा निर्णय…

६० वर्षावरील व्यक्तीला बुस्टर डोस देण्याचा निर्णय झाला आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी ६० वर्षांवरील नागरिकांना लस मिळेल. पर्यटनस्थळी दोन्ही लस घेतलेल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी, तर देवदर्शनाल जाणाऱ्या लोकांना ज्याचे दोन डोस झाले आहेत त्यांनाही परवानगी देण्यात येईल. एक कोविडमुक्त गाव अभियान सुरू केलं आहे. त्यात १३८५ ग्रामपंचायत सहभागी झाल्या आहेत. पुणे विभागात हा कार्यक्रम राबवला जाईल, राज्यातदेखील हे करावं असं सांगण्यात आल आहे. त्याबाबात पण विचार सुरु आहे. ७ ते ९ ऑनलाईन ट्रेनिंग सुरू करण्यात आल आहे.

पुणे जिल्ह्यात ४४ गावे आहेत, जिथं एकही कोरोना रुग्ण नाही…

बऱ्यापैकीं कारखाने सुरू झाले आहेत. ज्या ठिकाणी जास्त कामगार काम करतात त्या ठिकाणी सर्व कामगारांना दोन डोस दिलेच पाहिजेतच. असे अजित पवार म्‍हणाले. लसीचे दोन्ही डोस घेतले तर जास्त तीव्रता राहत नाही. त्यामुळे लसीकरण गरजेचे असल्‍याचे ते म्‍हणाले.

डिसले गरूजी प्रकरणी काही तरी कारण असू शकतं…

मुंबईतील इमारत आग दुर्घटनेवर बोलताना त्‍यांनी मुबंई आग प्रकरणी चौकशी होईल, दोन तासांत आग आटोक्यात आणली, सगळे पाहत आहेत. आदित्य ठाकरे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे सगळे या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. डिसले गुरुजी प्रकरणी बोलताना पवार यांनी डिसले गरूजी प्रकरणी काही तरी कारण असू शकतं, ते चांगलं काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली.

राज्य मागासवर्गीय आयोगाबाबत मुख्यमंत्री स्तरावर एक बैठक होणार आहे, त्यात आम्ही पण असणार आहे, हा प्रश्न फार गंभीर बनला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही हा प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

नगरपंचायत निवडणूक निकालावर बोलताना पवार यांनी आम्ही तिघे एकत्र लढलो असतो तर वेगळा निर्णय आला असता, पण तिघे वेगवेगळे लढून काय आकडा आहे तो तुम्ही पाहू शकता. तिघे एकत्र लढले असते तर संख्या वेगळी पाहायला मिळाली असती.
अमोल कोल्‍हे यांच्या नथुराम गोडसे भूमिकेवर बोलताना मी अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा केली होती, मीच त्यांना पवार साहेबांकडे घेऊन गेलो होतो. मग ते २०१९ ला निवडणूक लढले, त्याने ते २०१७ ला भूमिका केली. त्याला आक्षेप घेण्यात अर्थ नाही. त्यामुळे कोणी पक्षात येण्याअगोदर काय केलं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे अनेकांनी भूमिका केल्या आहेत. पवार साहेब अन् जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची भूमिका मांडली. मी माझी भूमिका मांडली, जुन्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही, एक कलावंत म्हणून त्यांनी ऑफर स्वीकारली होती. पुरोगामी विचार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारून ते राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असल्‍याच ते म्‍हणाले.

Back to top button