मुंबई पालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी राज्यपालांकडे तक्रार करणार : चंद्रकांत पाटील - पुढारी

मुंबई पालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी राज्यपालांकडे तक्रार करणार : चंद्रकांत पाटील

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणी राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज  दिली. ते माध्यमांशी बोलत होते.

विहंग गार्डनच्या दंड माफीविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. राणी बागेतील प्राण्यांचे वास्तू बनवण्यासाठी १०६ कोटी कंत्राट प्रकरणी राज्यपालांकडे तक्रार करणार असून, हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहे, चंद्रकांत पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.  लोकायुक्त आणि उपलोकायुक्तांकडेही तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचलं का? 

Back to top button