पालघर : वाघोबा खिंडीत दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प, रेड अलर्ट जारी (video) | पुढारी

पालघर : वाघोबा खिंडीत दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प, रेड अलर्ट जारी (video)

पालघर : पुढारी वृत्तसेवा : पालघर जिल्ह्यात यापुढील चार दिवस हवामान खात्याने रेडअलर्ट जारी केला आहे. बुधवार सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मनोर – पालघर महामार्गावरील वाघोबा खिंडीत दरड कोसळून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु, दोन जेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या साहाय्याने माती बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती शासकीय यंत्रणेने दिली आहे.

वाघोबा खिंडीत दरड कोसळली, माती आणि दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत.

वसई तालुक्यातील वालीव पोलीस स्टेशन हद्दीतील राजीवली गावातील वाघराळपाडा भागात एका चाळीवर दरड कोसळली. यामध्ये वडील आणि मुलगी मातीखाली दबले गेल्याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे. उर्वरित दोघांना अधिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अमित ठाकुर (वय ३५, वडील), रोशनी ठाकुर (वय १४, मुलगी) अशी त्यांची नावे आहेत.


दरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते.

पालघर तालुक्यातील धुकटन पाण्याच्या टाकीजवळील रस्त्यावर सूर्या नदीचे पाणी भरले. वाहतूक संथगतीने सुरू

Back to top button