कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, पंचगंगा इशारा पातळीकडे; ५५ बंधारे पाण्याखाली | पुढारी

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, पंचगंगा इशारा पातळीकडे; ५५ बंधारे पाण्याखाली

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस कोल्हापुरात पावसाने चांगलाच जोर लावला आहे.  संततधार पावसाने पंचगंगा नदी इशारा पातळीकडे जात आहे. बारा नद्यांवरील एकूण 55 बंधारे पाण्याखाली गेले असून, त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. सकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

१३ जूलै २०२२ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत
 २ वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३५ फूट ९ इंच इतकी आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट आहे. १२ नदींवरील एकुण  ५५ बंधारे पाण्याखालील आहेत.
दि.१३/०७/२०२२, दुपारी २ वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी ३५ फूट ९ इंच इतकी आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे.) एकूण पाण्याखालील बंधारे : ५५
१३ जूलै २०२२ रोजी सकाळी १२ वाजेपर्यंत
 आज सकाळी १२ वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३५ फूट ८ इंच इतकी आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट आहे. १२ नदींवरील एकुण  ५५ बंधारे पाण्याखालील आहेत.  

पंचगंगा : पावसाचा जोर कायम 

 
गेले दोन आठवडे सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत जिल्ह्यात शुक्रवार, दि. 15 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. या कालावधीत जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 
 कोल्हापूर जिल्ह्यातील पुढील नदीवरील बंधारे पाण्याखाली आहेत. (सकाळी १२ पर्यंतचे अपडेट)
 
पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ
भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे व शिरगांव
कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव
कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे व कोपार्डे,
वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे व गारगोटी
घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे,
वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची, मांगले सावर्डे, चावरे व दानोळी
दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली, सुळंबी, कसबा वाळवे व तुरंबे
कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडूकली
तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी
ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड
धामणी नदीवरील- सुळे, पणुंद्रे व आंबर्डे

Back to top button