Uttarakhand Accident : उत्तरकाशीमध्ये यमोनोत्री महामार्गावर बोलेरो दरीत कोसळून महाराष्ट्रातील ३ भाविकांचा मृत्यू | पुढारी

Uttarakhand Accident : उत्तरकाशीमध्ये यमोनोत्री महामार्गावर बोलेरो दरीत कोसळून महाराष्ट्रातील ३ भाविकांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुरुवारी रात्री उशिरा महाराष्ट्रातील १२ भाविकांना घेऊन जात असलेली बोलेरो गाडी उत्तरकाशीमध्ये दरीत कोसळून चालकासह २ भाविकांचा मृत्यू तर १० जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरकाशीमधील यमोनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो गाडी महाराष्ट्रातील १२ प्रवाशांना घेऊन गुरवार (दि. २६) रोजी रात्री उशिरा जानकीछत्ती येथून बरकोटकडे जात होती. यावेळी ओझरी ते सायना चाटी दरम्यान बस ला साईड देताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी दरीत कोसळली. यावेळी एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला तर इतर १० जण जखमी झाले आहेत.

अपघात स्थळी तात्काळ पोलीस व रुग्णवाहिका दाखल झाले. १० जखमींवर आरोग्य केंद्र बरकोट आणि नौगाव येथे दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींमध्ये चार मुलांचा समावेश असून सर्व प्रवाशी महाराष्ट्रातील रहिवासी आहेत.

 

 

Back to top button