सिन्नर : घोरवड घाटात दुचाकी-व्हॅनच्या धडकेत २ ठार

सिन्नर : घोरवड घाटात दुचाकी-व्हॅनच्या धडकेत २ ठार

Published on

शिवडे- सिन्नर रस्त्यावर दुचाकी व व्हॅन यांच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले.

रामदास मुरलीधर भारमल (वय ४५) व विष्णू केरु गिर्हे (वय ५३) दोघेही रा. शिवडे ता. सिन्नर असे मृत झालेल्यांची नावे आहेत. शिवडे घाटात अपघात झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी अधिक तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news