सातारा : मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा मृत्यू | पुढारी

सातारा : मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा मृत्यू

सातारा : पुढारी वृत्तसेवा

गेल्या १० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. असे असतानाच साताऱ्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

संतोष वसंत शिंदे (वय ३४, रा. आसगाव ता. सातारा) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ते मेढा एसटी डेपोचे कर्मचारी असून तटपुंजा पगार व संपामुळे ते तणावाखाली होते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, संतोष शिंदे यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. तीन वर्षांपूर्वी ते मेढा एसटी डेपोमध्ये रुजू झाले होते. अशातच लॉकडाऊन लागले व आता संप सुरू झाला. यामुळे तटपुंज्या पगारात जगायचे कसे या विचाराने ते हताश झाले होते. अशातच गेल्या आठ दिवसापासून ते तणावाखाली होते. काल मध्यरात्री त्यांना त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुर्दैवाने मात्र त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

संतोष शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, आई, वडील, दोन लहान भाऊ असा परिवार आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button