नाशिक : नाशिकरोडला दोघा पदाधिकाऱ्यांची ठाकरे गटात घरवापसी

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याप्रसंगी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी नगरसेवक भय्या मणियार, योगेश भोर
मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याप्रसंगी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी नगरसेवक भय्या मणियार, योगेश भोर
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

गेल्यावर्षी पूर्वी शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून भाजपवासी झालेले माजी नगरसेवक अस्लम भय्या मणियार हे स्वगृही परतले असून, त्यांच्यासोबत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही सोमवारी (दि. १६) शिवसेनेत प्रवेश केला.

माजी नगरसेवक अस्लम मनियार हे पूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. मात्र त्यानंतर देवळाली गाव येथे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे व मणियार यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याने व शिवसेनेतील गटबाजीला कंटाळून त्यांनी गेल्या वर्षी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र गेल्याच महिन्यात नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्यासह नाशिकरोडमधील पाच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. परिणामी, देवळाली गाव येथील प्रभाग क्रमांक 22 मधून शिंदे गटातर्फे लवटे यांचा लढण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, लवटे हे शिंदे गटात गेल्याने अस्लम मणियार यांनी पुन्हा शिवसेनेत परतण्याचा विचार केला. सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी त्यांच्यासोबत दोन ते तीन बैठका घेऊन शिवसेनेत येण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे मणियार यांच्यासह देवळाली गाव येथील प्रशांत जाधव, भाजपचे पदाधिकारी योगेश भोर, मदन ढेमसे, सागर कोकणे यांच्यासह भाजयुमोच्या सुमारे 100 कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, योगेश घोलप, माजी नगरसेवक विलास शिंदे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दीपक दातीर, डी. जी. सूर्यवंशी, केशव पोरजे, सचिन मराठे, महेश बडवे, राहुल ताजनपुरे, भारती ताजनपुरे, शोभा मगर, मंगला भास्कर, योगेश गाडेकर, नितीन चिडे, देवा जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news