गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तिने सुरू केला चहाचा व्यवसाय; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क! | पुढारी

गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तिने सुरू केला चहाचा व्यवसाय; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

नवी दिल्ली: ब्रिटिश कौन्सिलमध्ये भक्कम पगाराची नोकरी सोडून चक्क स्वतःचा चहा विक्रीचा स्टॉल एका तरुणीने राजधानी दिल्लीत टाकला आहे. सध्या सोशल मीडियासह या तरुणीच्या स्वावलंबी होण्यावर जोरदार चर्चा होत आहे.

निवृत्त ब्रिगेडियर संजय खन्ना यांच्या एका पोस्टमुळे शर्मिष्ठा घोष ही तरुणी चर्चेत आली आहे. तिने इंग्रजी साहित्यात एम. ए. केले आहे. ती ब्रिटिश कौन्सिलमध्ये चांगली नोकरी करायची. तिच्याशी बोलताना वेगळे काही करण्याची तिची प्रबळ इच्छा बघून भारावल्याचे ब्रिगेडियर खन्ना लिहितात. दिल्ली कॅन्टोन्मेंटच्या गोपीनाथ बाजार येथे काम आटोपल्यावर चहा पिण्याची इच्छा झाली आणि एक फड इंग्रजीत बोलणारी तरुणी हातगाडीवर चहा विकत असल्याचे दिसले. तिच्याशी बोलल्यावर तिची कहाणी कळली.

तिला ‘चायो’ या प्रसिद्ध ब्रँडसारखा आपला चहा मोठा करायचा आहे. तिच्यासोबत भावना राव नावाची तिची एक मैत्रीणही असते. तीही लुफ्तान्सा एअरलाईन्समध्ये नोकरी करते. या दोघी रोज सायंकाळी गोपीनाथ बाजार येथे आपला स्टॉल लावतात. आपल्याला आपल्या आवडीचे काम करायला आवडते. त्यातच नाव कमावण्याची इच्छा असल्याचे शर्मिष्ठाने सांगितले.

Back to top button