

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगाव बसवंत शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम दुसऱ्यांदा फोडून चोरट्यांनी १९ लाख ६ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारला. यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.(Nashik Crime)
एक महिन्यापूर्वी चिंचखेड चौफुलीवरील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी २८ लाख रुपयांवर डल्ला मारला होता. त्यानंतर मंगळवार, दि. २६ रोजी भरवस्तीत असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला होता. मात्र, त्या एटीएमचे सायरन व सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी नादुरुस्त केले होते. ते बँक प्रशासनाने दुरुस्ती केलेच नाही. त्यामुळे चोरट्यांनी पुन्हा तेच एटीएम लक्ष करत त्यातून जवळपास १९ लाख ६ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारत पोबारा केला आहे.
संबधित बातम्या :
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील स्टेट बँकेचे एटीएम मंगळवारी फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. मात्र, दुसऱ्याच दिवशी हेच एटीएम फोडून चोरट्यांनी आपला डाव साधला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील भामरे, पोलीस निरीक्षक अशोक पवार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दोन्ही एटीएम फोडण्याचा प्रकार एकसारखाच असल्याने पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी सांगितले की, मंगळवारी दि. २६ रोजी जो एटीएम चोरीचा प्रयत्न झाला तो तात्काळ अलर्ट एसबीआयच्या एटीएम सेक्युरिटी यांनी दिला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, बुधवार, दि. २७ रोजी एक वाजता एटीएम चोरीसाठी चोर त्या ठिकाणी गेले. तो सायरन अलर्टही एटीएम सेक्युरिटी यांना मिळाला. मात्र, त्यांनी तो अलर्ट पोलिसांना न दिल्यामुळे सदर एटीएम चोरीचा डाव यशस्वी झाला. जर तात्काळ एटीएम सेक्युरिटी एसबीआय यांनी सदर अलर्ट पोलिसांना दिला असता तर पुन्हा चोरांचा डाव फसला असता आणि कदाचित ते चोर जेरबंद देखील झाले असते.
हेही वाचा :