Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार २९, २०२३ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार २९, २०२३

चिराग दारूवाला

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
राशिभविष्य

मेष : श्रीगणेश सांगतात की, आज घर आणि कौटुंबिक आनंदासाठी वेळ काढाल. आपल्‍या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवून तुमच्या योजना सुरू करा. मुलांशी मैत्रीपूर्ण वागा. संवाद साधताना योग्य शब्द वापरा. कामाच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची कागदपत्रे योग्‍यरित्‍या हाताळा.

वृषभ

वृषभ : खूप दिवसांनी घरात पाहुणे आल्याने आनंदी वातावरण असेल, असे श्रीगणेश म्‍हणतात. कौटुंबिक वादही मिटतील. हट्टीपणामुळे मातृपक्षाशी संबंध खराब होऊ शकतात. नकारात्मक लोकांपासून लांब राहा. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि कर्मचाऱ्यांशी संबंध खराब होऊ देऊ नका. व्यावसायिक बाबींचा तुमच्या घरावर परिणाम होऊ देऊ नका. पोटविकारामुळे अस्वस्थ वाटण्‍याची शक्‍यता.

राशिभविष्य

मिथुन : कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही योग्यरित्या पार पाडू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. घरातील वातावरण आनंदी राहिल. नकारात्मक घटनांचा तुमच्यावर परिणाम होऊ न देण्याचा प्रयत्न करा. सर्व प्रकारचे व्यवहार टाळा. वैवाहिक नात्यात गोडवा राहिल.

कर्क

कर्क : तुमची वैयक्तिक कामे आज यशस्वीपणे पूर्ण होतील, असे श्रीगणेश सांगतात. एखाद्या खास व्यक्तीचे सहकार्यही मिळेल. एखाद्यावर विश्वास ठेवल्याने विश्वासघात होण्‍याची शक्‍यता. दिवसभराच्या कामानंतर, कुटुंबासोबत वेळ व्‍यतित केल्‍याने उत्साही वाढेल. आरोग्य उत्तर राहिल.

सिंह

सिंह : नवीन गोष्टी शिकण्यात आजवेळ घालवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. खर्च जास्त होईल. तसेच, उत्पन्नाचे साधनही वाढेल. नकारात्मक विचार टाळा. कार्यक्षेत्रात मेहनत घ्‍यावी लागेल. वैवाहिक जीवन आनंदी क्षण व्‍यतित कराल.

कन्या

कन्या : आज कौटुंबिक किंवा सामाजिक संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, असे श्रीगणेश सांगतात. कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवल्याने तुमचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्‍या.

तुळ

तूळ : न्यायालयात खटला चालू असेल तर आज निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. दूरचे नातेवाईक आणि मित्रांशी भेट होण्‍याचे योग आहेत. दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू नका; कोणालाही अनावश्यक सल्ला देऊ नका. पोटाशी संबंधित समस्या जाणवू शकते.

राशिभविष्य

वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, आजच्या दिवशी नियमित कामांव्यतिरिक्त काही वेळ आत्मचिंतनात घालवा. घराच्या अंतर्गत बदला संबंधित योजनाचा विचार करा. इतरांना जास्त शिस्त लावण्‍याचा प्रयत्‍न करु नका. भागीदारीचे नियोजन टाळा. पती-पत्नीमध्ये वाद होण्‍याची शक्‍यता. तब्‍येतीची काळजी घ्‍या.

राशिभविष्य

धनु : काही काळापासून सुरू असलेली तुमची मेहनत आज लाभदायक ठरेल, असे श्रीगणेश सांगतात. कामावर लक्ष केंद्रित करा. काही अज्ञात विषयांमध्ये तुमची आवडही जागृत होईल. पती-पत्नीमधील भावनिक नाते दृढ होईल.

राशिभविष्य

मकर : नातेवाईकांना त्यांच्या गरजेच्या वेळी पूर्ण सहकार्य कराल, असे श्रीगणेश म्‍हणतात. तुमच्या विनम्र स्वभावामुळे घरात आणि समाजात तुमची प्रशंसा होईल. शेजाऱ्यांसोबतचा जुना वादही मिटू शकतो. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

कुंभ

कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, काही जवळच्या लोकांच्या भेटीमुळे चांगले परिणाम मिळू शकतात. मुलांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्‍य द्‍या. स्‍वत:च्‍या यशाची प्रशंसा करू नका; त्यामुळे तुमच्या प्रतिस्‍पर्धींमध्‍ये मत्सराची भावना निर्माण होऊ शकते. तुमच्या कुटुंबाप्रती तुमचे समर्पण घरामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राखेल. सांधेदुखीचा त्रास वाढण्‍याची शक्‍यता.

मीन

मीन : आज घरात विशेष पाहुण्यांच्या आगमनामुळे तुम्ही व्यस्त राहू शकता, असे श्रीगणेश सांगतात. दैनंदिन कामातून थोडा वेळ आराम आणि मौजमजेसाठी घालवाल. मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. जोडीदाराशी मतभेद टाळा.आरोग्य चांगले राहिल.

Back to top button