नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार

नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाळा संपताच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मजुरांची पावले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांकडे वळत आहेत. मनरेगाच्या माध्यमातून पंधराही तालुक्यांत सध्या 1 हजार 852 कामे सुरू आहेत. या कामांवर तब्बल 8 हजार 286 मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याची जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

यंदा जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली असून, अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसाळा संपुष्टात येऊन महिनाभराचा कालावधी लोटला असला तरी शेतीशिवाराच्या परिस्थितीत अद्यापही सुधारणा झालेली नाही. परिणामी शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील मजुरांची पावले रोजगारासाठी आपोआप मनरेगाच्या कामांकडे वळता आहेत. शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मनरेगांंतर्गत यंत्रणा व ग्रामपंचायत स्तरावर विविध 18 ते 20 प्रकारची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने घरकुल, वृक्षलागवड, रस्ता खडीकरण, फळबागा लागवड, रस्ते, पोल्ट्री, गोट व कॅटल शेड, विहिरींसह अन्य कामांचा समावेश आहे. यंत्रणास्तरावर 523, तर ग्रामपंचायत पातळीवर 1 हजार 329 अशी एकूण 1 हजार 852 कामे प्रगतिपथावर आहेत. या दोन्ही प्रकारच्या कामांवर तब्बल 8 हजार 286 मजुरांची उपस्थिती लाभली आहे. दरम्यान, मनरेगाला मिळणार प्रतिसाद बघता तसेच येत्या काळात कामांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने मार्चअखेर योजनेंतर्गत कामांचे नियोजन केले आहे.

मजूर उपस्थिती :

बागलाण 796
चांदवड 459
देवळा 171
दिंडोरी 545
इगतपुरी 396
कळवण 482
मालेगाव 1,157
नांदगाव 613
नाशिक169
निफाड 386
पेठ 753
सिन्नर 404
सुरगाणा 1,013
त्र्यंबक 363
येवला579
एकूण 8,286

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news