शेवगाव : ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त | पुढारी

शेवगाव : ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील 12 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून, दहा दिवसांनी (दि.28) सोमावारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तालुक्यातील 12 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीस राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकरण अधिकारी तथा तहसीलदारांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती नोटिसाद्वारे केली आहे.

या निवडणुकीसाठी 28 नोव्हेबर ते 2 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. निवडणुकीसाठी अमरापूर – आर. के. सरोदे (विस्तार अधिकारी), जोहरापूर व खामगाव – राहूल कदम (कृषी अधिकारी), दहिगाव-ने – आर. बी. साळवे, (शाखा अभियंता), रांजणी – जी. एम. फाजगे (विस्तार अधिकारी), कुरुडगाव रावतळे – एस.एस.भोंग (विस्तार अधिकारी), खानापूर – डी. एम. भांड (विस्तार अधिकारी), सुलतानपूर खुर्द – एस. एस. जगताप (विस्तार अधिकारी), भायगाव – आर. एस. जाधव (विस्तार अधिकारी), वाघोली – दुग्गम सांरग (कृषी आधिकारी), आखेगाव – डी. बी. शेळके (विस्तार अधिकारी), प्रभुवाडगाव – गणेश वाघ (मंडळ कृषी अधिकारी) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

Back to top button