नाशिक : रेनवॉटर हार्वेस्टिंग करा, मनपाचा पुरस्कार मिळवा

नाशिक : रेनवॉटर हार्वेस्टिंग करा, मनपाचा पुरस्कार मिळवा
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रेनवॉटर हार्वेस्टिंगची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या सोसायट्यांना (गृहनिर्माण संस्था) महापालिका पुरस्कार देणार आहे. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गोदावरी नियंत्रण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पर्यावरणपूरक मित्र इमारत आणि पर्यावरणपूरक मित्र सोसायटी (गृहनिर्माण संस्था, मोस्ट एन्व्हायरमेंट फ्रेण्डली बिल्डिंग/सोसायटी) असे दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी मनपाच्या वेबसाइटवर गोदावरी संवर्धन कक्ष विभागाच्या लिंकवर १५ मे पर्यंत माहिती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छ झोपडपट्टी (मोस्ट क्लीन स्लम) पुरस्कार योजनाही लवकरच राबिवली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मनपाकडून प्लास्टिक बंदी मोहीम आणखी व्यापक करून कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी बचतगटांमार्फत व्हेंडिंग मशीन लावण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या पिशव्यांवर प्लास्टिक बंदीचा मजकूर आणि मनपाचा लोगो असणार आहे. याशिवाय गोदावरी आणि उपनद्यांचे प्रदूषण थांबविण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. उपआयुक्त (गोदावरी संवर्धन कक्ष) डॉ. विजयकुमार मुंढे यांनी प्रास्ताविक केले.

या बैठकीला अशासकीय सदस्य राजेश पंडित, निशिकांत पगारे यांच्यासह उपप्रादेशिक अधिकारी (एमपीसीबी) अमर दुर्गुळ, विभागीय माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, उपआयुक्त करुणा डहाळे, शहर अभियंता शिवकुमार वंझारी, स्मार्ट सिटी सीईओ सुमंत मोरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे, नगर नियोजन विभाग उपसंचालक हर्षल बाविस्कर, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, संदेश शिंदे, गणेश मैड, राजेंद्र शिंदे, नितीन धामणे, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम उपस्थित होते.

मलजलशुद्धीकरण प्रकल्प अद्ययावत करणार

तपोवन, आगरटाकळी, चेहर्डी, पंचक या चार मलजलशुद्धीकरण केंद्रांची (एसटीपी) अद्ययावत सुधारणा करण्याच्या कामाचे अहवाल एनआरसीडी (राष्ट्रीय नदीसंवर्धन विभाग) यांच्याकडे सादर केले आहेत. तपोवन आणि आगरटाकळी या दोन मलजलशुद्धीकरण केंद्राच्या सुधारणेसाठी शासनाच्या तांत्रिक समितीची मंजुरी मिळाली आहे. मखमलाबाद, कामटवाडा येथे दोन नवीन मलजलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार असल्याची माहिती मनपाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी यावेळी दिली. तसेच 'नमामि गोदा' प्रकल्पासाठी सल्लागार कंपनीने मलजल वाहिनीचे (सिव्हर लाइन) ३० टक्के सर्वेक्षण पूर्ण केले आहे. जीआयएस मॅपिंगचे काम सुरू असल्याची माहिती चव्हाणके यांनी दिली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news