Nandurbar ZP : दुपारपर्यंत पन्नास टक्के मतदारांनी केले मतदान

Nandurbar ZP : दुपारपर्यंत पन्नास टक्के मतदारांनी केले मतदान

Nandurbar ZP : येथील जिल्हा परिषदेच्या अकरा गटांच्या तसेच पंचायत समितीच्या १४ गणांच्या पोट निवडणूकीचे मतदान अद्याप शांततेत चालू आहे. दुपारी दोन वाजेपर्यंतच्या माहितीनुसार पन्नास टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

दरम्यान कुठेही कोणताही अनुचित घडला नसल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल पवार यांनी दिली. मतदान प्रक्रिया आणि कायदा-सुव्यवस्था त्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी नंदुरबार ( Nandurbar ZP )तालुक्यातील कोळदा, खोंडामळी, भागसरी येथील मतदान केंद्रांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी कडक बंदोबस्तत ठेवला असून १००० पोलिस अधिकारी कर्मचारी व एस. आर. पी. च्या दोन कंपन्या तैनात ठेवण्यात आले आहेत.

( Nandurbar ZP ) सकाळी ७.३० ते ११.३० पर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी :

महिला मतदार – ३५१०८
पुरुष मतदार – ३७१५२
एकूण मतदान – ७२२६०
टक्केवारी – २५.५९%*

( Nandurbar ZP ) दुपारी १.३० पर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी :

महिला मतदार – ६०१५८
पुरुष मतदान -५९६२८
एकूण मतदान – १२०१४६
टक्केवारी – ४२.५५ %

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news