Nashik : नाशिक मनपाने ग्रामीण बससेवा सुरू केल्याने वादाची चिन्हे | पुढारी

Nashik : नाशिक मनपाने ग्रामीण बससेवा सुरू केल्याने वादाची चिन्हे

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक ( Nashik ) महानगर परिवहन महामंडळाच्या ग्रामीण भागातील बससेवेला राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. सिन्नर आगारात मंगळवारी (दि.5) प्रवेशद्वारावर शेकडो कर्मचाऱ्यांनी एकत्र येत निषेध नोंदवला. महानगर परिवहन महामंडळाची बससेवा बंद करा अन्यथा विपरित परिणाम होतील, असा इशारा आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी दिला. त्यामुळे नाशिक मनपा परिवहन आणि राज्य परिवहन महामंडळात वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत.

महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेचे विभागीय सचिव देवा सांगळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नाशिक-सिन्नर ( Nashik ) मार्गावरील बससेवेच्या माध्यमाने राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर आगाराला मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र नाशिक महानगर परिवहन महामंडळाने सिन्नर मार्गावर लक्ष केंद्रीत करत सोमवारपासून (दि.4) बससेवा सुरु केली. त्यामुळे सिन्नर आगाराच्या उत्पन्नात घट होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी चालक, वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. मनपा परिवहन महामंडळाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांची सेवा करावी. राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर घाला घालू नये.

-देवा सांगळे, विभागीय सचिव ( महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना, नाशिक )

अधिक वाचा :

Back to top button