जळगाव : भुसावळमध्ये कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

जळगाव : मृतदेहाची पाहणी करत घटनास्थळी पंचनामा करताना बाजारपेठ पोलिस. (छाया: चेतन चौधरी)
जळगाव : मृतदेहाची पाहणी करत घटनास्थळी पंचनामा करताना बाजारपेठ पोलिस. (छाया: चेतन चौधरी)

जळगाव : पुढारी वृत्तासेवा

भुसावळात कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेहजळगाव: भुसावळ शहरातील वांजोळा रोडवर कुजलेल्या स्थितीतीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आहे.

गेल्या आठवड्यात भुसावळ शहरातील रेल्वे पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. पुन्हा वांजोळा रोडवर अज्ञात  इसमाचा मृतदेह आढळला आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वांजोळा रोडवर मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस नाईक किशोर महाजन, पोलीस हेड कॉन्सटेबल विजय नेरकर यांच्यासह पथक घटनास्थळी धावले. त्यांनी मृतदेहाची पाहणी करत घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. यासंदर्भात मृतदेहाचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच अज्ञाताचा मृत्यू कशामुळे झाला आहे, ते समजणार आहे. मयतची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news