नाशिकमध्ये भरलंय दुर्मिळ नोटांचे प्रदर्शन, अगदी दहा हजारांची नोटही मिळेल बघायला

नाशिकमध्ये भरलंय दुर्मिळ नोटांचे प्रदर्शन, अगदी दहा हजारांची नोटही मिळेल बघायला
Published on
Updated on

नाशिक : नाशिक रोड येथील चलनी नोटांच्या कारखान्यात दुर्मिळ नोटांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. एक रुपयाच्या नोटेपासून 10 हजार ते आताच्या दोन हजार रुपये मूल्य असलेल्या अतिशय दुर्मीळ नोटा या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या प्रदर्शनात इंग्लंड, नेपाळ, चीन तसेच हैदराबाद निजामाचे चलनही पाहायला मिळेल. प्रदर्शन सामान्य नागरिकांना खुले असून, आधारकार्डशिवाय प्रवेश दिला जात नाही.

 भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात प्रेसच्या स्थापनेपासून आजपर्यंत छपाई झालेल्या सर्व दुर्मीळ नोटा नागरिकांना पाहायला व अनुभवायला मिळत आहे. बुधवारी (दि. 8) या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. करन्सी नोटप्रेसची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत नोटांच्या डिझाईन आणि आकारात प्रचंड बदल होत गेला आहे. बदलानिमित्तााने नोटांचा विकास होऊन प्रेसची वेगाने प्रगती झाली. यामागे प्रेस कामगारांचे कष्ट कारणीभूत असल्याचे गौरवोद्गार प्रेस महामंडळाच्या सीएमडी तृप्ती पात्रा घोष यांनी यावेळी काढले.

सीएमडी घोष पुढे म्हणाल्या की, नोटांची छपाई व त्याचे तंत्रज्ञान आम्ही सामान्य नागरिकांपासून गुप्त ठेवतो. याविषयी कोणतीही माहिती आम्ही जाहीर करीत नाही. पण सरकारने देशाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने दि. 6 ते 12 जूनदरम्यान वित्त विभागाला ही परवनगी दिली. खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, संपूर्ण देशात येथील प्रेसची नोट छपाई प्रसिद्ध आहे. त्यामुळे नाशिकला भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे.

नोट प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू म्हणाले की, चलन हे एक माध्यम तसेच विनिमयाचे साधन आहे. 1928 पासून नाशिकरोडच्या प्रेसमध्ये नोटांची छपाई सुरू झाली. सोहळ्याला विनयकुमार सिंग, बी. के. आनंद, मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, शिर्डी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बनायत, प्राप्तिकरचे सहआयुक्त शैलेंद्र राजपूत, बीएसएनएलचे नितीन महाजन, जीएसटीचे प्रवीण पांडे, आयबीचे अमित मोती, प्रेस मजदूर संघाचे उपाध्यक्ष जयराम कोठुळे, संतोष कटाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news