पिंपरी: मान्सूनपूर्व कामाची नाणे मावळात लगबग; जनावरांचा चारा ठेवला झाकून | पुढारी

पिंपरी: मान्सूनपूर्व कामाची नाणे मावळात लगबग; जनावरांचा चारा ठेवला झाकून

कामशेत : पुढारी वृत्तसेवा

येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होणार असल्यामुळे जनावरांसाठी चारा साठवणीच्या कामात बळीराजा व्यस्त असल्याचे चित्र कामशेत परिसरात दिसत आहे. अनेक मान्सूनपूर्व कामे करताना शेतकरी दिसत आहेत. साधारणत जूनच्या दुसर्‍या आठवड्यामध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. या पावसाच्या शक्यतेवर बळीराजा पीक पेरणीसाठी शेत जमीनीची मशागत करून ठेवतो.

यामध्ये नांगर निट निटकेपणा करणे, औत धरणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, बांध बंदिस्ती करून घेणे, शेतातील तण काढणे इत्यादी मान्सूनपूर्व कामे शेतकरी उरकून घेत असल्याचे दिसून येत आहे. पिकासाठी जमिनीची तयारी करावी लागत असल्याचे पावसाळ्यात जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शेतकर्‍यांनी या कामाची सुरुवात केली आहे.

तसेच, चार्‍याची साठवण करून चारा झाकून ठेवण्यात येत आहे आहे. मात्र, सध्या परिसरातील शेतकरी ऐन पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणे कठीण होवून जाते. त्यासाठी जनावरांच्या चार्‍याची सोय करून ठेवावी लागत असते. त्यामुळे अनेक शेतकरी चार्‍याची साठवणूक करण्याच्या कामात तसेच तो चारा पावसामुळे खराब होवू नये म्हणून प्लास्टिकचे मोठे कागद टाकून झाकून ठेवण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र नाणे मावळातील ग्रामीण भागात दिसून येत आहे.

हेही वाचा 

पिंपरी: संत तुकाराम महाराजांची पालखी आणि रथाला रथाला चकाकी

पिंपरी: सीडीएस परीक्षेत आदित्य देशात 20 वा

नाशिकच्या विंचूर येथे पोलिसाच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला, १४ तोळे सोने लंपास

Back to top button