पिंपरी: डुडुळगावात ड्रेनेज लाईन उघड्यावर; नागरिकांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

पिंपरी: डुडुळगावात ड्रेनेज लाईन उघड्यावर; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मोशी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील डुडुळगाव येथील तळेकर चौक भागात देहू-आळंदी रस्त्यालगत ड्रेनेज लाईन उघडीच असून त्यातील पाणी थेट ओढ्याला व ओढ्या मार्गे इंद्रायणी नदीला मिळत आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रदूषणातदेखील वाढ होत आहे.

याबाबत वारंवार तक्रार करूनदेखील महापालिकेकडून ही समस्या दूर केली जात नसल्याचे स्थानिक ग्रामस्थ सचिन तळेकर यांनी सांगितले. ड्रेनेज पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून समस्या तातडीने दूर न झाल्यास पालिके समोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी
दिला आहे.

या भागातील अनेक ठिकाणचे सांडपाणी महापालिकेने तळवडे भागातून आलेल्या एसटीपी वाहक पाईकला जोडले आहेत. मात्र, सदर लाईन थेट ओढ्यात मिसळत असताना त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे.सदर लाईनदेखील एसटीपीला जोडली जावी, अन्यथा ओढ्यात मिसळनारे सांडपाणी बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

पिंपरी: अखेर डांगे चौकातील मुख्य रस्त्याचे काम सुरू

डासांचा उपद्रव देखील या भागात सांडपाण्यामुळे वाढला असून महापालिकेने डास प्रतिबंधक धूर फवारणीदेखील करणे गरजेचे बनले आहे. या लाईन बरोबरच ओढ्यात थेट सोडण्यात आलेल्या इतर लाईनचेदेखील सर्वेक्षण कराव आणि दंडात्मक कारवाई बरोबरच सांडपाणी मार्गी लावणे गरजेचे असल्याचे येथील चित्र आहे.

एकंदरीतच झपाट्याने विकास होत असलेल्या डुडुळगाव भागातील सांडपाणी व्यवस्थापणाकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. येत्या काळात यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे लवकरात लवकर ही समस्या मार्गी लावण्याची मागणी केली जात आह.

हेही वाचा 

शिवसेनेकडून वडिलांचे खच्चीकरण : अतुल सावे

पिंपरी: मान्सूनपूर्व कामाची नाणे मावळात लगबग; जनावरांचा चारा ठेवला झाकून

पिंपरी: संत तुकाराम महाराजांची पालखी आणि रथाला रथाला चकाकी

Back to top button