

ताथवडे : पुनावळे गावातील ओव्हाळ वस्तीवर कचर्याचे ढीग साचले असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गावातील असलेल्या अंतर्गत रस्त्यावरील चौकांमध्ये कचर्याचे ढीग साचत आहेत. महापालिकेची घंटागाडी सकाळी एकदाच येऊन गेल्यानंतर दिवसभर नागरिक चौकातील रस्त्याकडेला कचरा टाकतात. त्यामुळे कचर्याचे ढीग साचत आहेत.
याचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने दिलेल्या घंटा गाडीमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून टाकावा लागतो. त्यामुळे घंटागाडीत कचरा टाकण्याऐवजी तो उघड्यावर टाकण्यात काहीजण धन्यता मानत आहेत. परंतु, यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचर्याचे ढीग साचले आहेत.
परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कचरा ओला झाल्यावर तो कुजून परिसरात आणखीनच दुर्गंधी पसरून डासांची उत्पत्ती होण्यास मदत होईल. त्यामुळे महापालिकेने याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी येथील रहिवाशांमधून होत आहे.
घंटा गाडीमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून टाकावा लागू नये म्हणून अनेकजण घंटागाडी गेल्यावर रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे रस्त्यावर कचर्याचे ढीग साचले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
– किशोर पवार, स्थानिक रहिवाशी
आमचे ध्येय परिसर कचरामुक्त करणे आहे. नागरिकांनी कचरा इतरत्र कुठेही उघड्यावर टाकू नये. आपले पिंपरी-चिंचवड शहर सुंदर बनवण्यासाठी नागरिकांनी कचरा घंटागाडीत कचरा टाकून सहकार्य करावे.
– महेश कन्नडे, आरोग्य निरीक्षक प्रभाग क्रमांक 25
https://youtu.be/wlEJDuHYtMU