

सिडको : पुढारी वृत्तसेवा : अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या उद्योजकीय संस्थेचे 2022-2024 या वर्षाकरिता मतदान आज रविवारी (दि.30) सकाळी 9 ते 5 या वेळेत होत आहे. आयमा निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल व विरोधी उद्योग विकास पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. आज दुपारपर्यंत 40 टक्के मतदान झाले आहे. मतदानासाठी केंद्रावर गर्दी दिसून येत आहे.
निवडणुकीत 1 अध्यक्ष, 1 उपाध्यक्ष, 1 जनरल सेक्रेटरी, 2 सेक्रेटरी, 1 खजिनदार व 24 कमिटी सदस्यांची निवड केली जाणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. 2 फेब्रुवारी रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकीत 1956 मतदार आहेत. अध्यक्षपदासाठी निखिल पांचाल व संजय महाजन यांच्यात लढत आहे. उपाध्यक्षासाठी राजेंद्र पानसरे व श्रीपाद कुलकर्णी, सरचिटणीस पदासाठी ललित बूब व एन. डी. ठाकरे तर सेक्रेटरी 2 जागांसाठी योगिता अहेर, गोविंद झा, जयंत पवार, कैलास आहेर. तर खजिनदारसाठी 1 जागा आहे. राजेंद्र कोठावदे व आर. एस. जाधव यांच्यात लढत होत आहे. तसेच 24 कमिटी सदस्यांसाठी 47 उमेदवार रिंगणात आहेत.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.