गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; व्हेंटिलेटरही काढले | पुढारी

गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; व्हेंटिलेटरही काढले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. त्या कोरोनामुक्तही झाल्या आहेत. लता दीदींचे व्हेंटिलेटर काढले आहे. उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दीदींच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी विठ्ठलाला साकडे देखील घातले.

कोरोनाची लागण झाल्यानंतर लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे.

त्यांंच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतीत समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनिया देखील झाला आहे, ज्याला कोविड न्यूमोनिया असेही म्हणतात. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. पाच डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.

92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणार्‍या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात प्रभू कुंज येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचलं का ?

Back to top button