Pratibha Chakankar: ‘समता’ पतसंस्थेत 2.40 कोटींचे व्यवहार उघड; चाकणकर खात्यांवर पोलिसांची नोटीस

शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणाशी धागेदोरे; खातेधारकांना चौकशीसाठी पाचारण, जामीन अर्जावर आज सुनावणी
Pratibha Chakankar
Pratibha ChakankarPudhari
Published on
Updated on

नगर: ‌‘समता‌’ पतसंस्थेत चाकणकर नावे असलेल्या चार खात्यातून 2 कोटी 40 लाखांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. प्रतीभा चाकणकर यांच्यासह त्या चारही खातेधारकांना पोलिसांनी नोटीस पाठवत जबाबासाठी बोलविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Pratibha Chakankar
Rahuri Bypoll Election: राहुरी पोटनिवडणुकीत सात उमेदवार रिंगणात; भाजप-राष्ट्रवादीत प्रतिष्ठेची लढत

ज्यांच्या नावे समतामध्ये खाते आहेत त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होऊ शकला नाही, अशा खातेधारकांना पोलिसांनी पोस्टाने नोटीसा बजावल्या आहेत. दरम्यान, शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात आरोपी कल्पना खरातच्या जामीन अर्जावर आज शुक्रवारी राहाता कोर्टात सुनावणी होणार आहे.

Pratibha Chakankar
Fertilizer Price Hike: खत दरवाढीचा फटका; खरीपपूर्वी शेतकरी संकटात

बहुचर्चित भोंदू खरात याने शिर्डीतील काही एजंटांच्या मदतीने रावसाहेब गोंदकर याची 50 कोटी बाजारमुल्य असलेली चार एकर जमीन पाच कोटींमध्ये हडपली. या प्रकरणी पोलिसांत अशोकखरात, त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह किरण सोनवणे, अरविंद बावक व अशोक तांबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. यातील अशोक खरात हा पुर्वीपासून अटकेत आहे. तर सोनवणे आणि बावके आता न्यायालयीन कोठडीत आहेत. कल्पना खरात आणि अशोक तांबे हे फरार आहेत. नगर पोलिसांनी ‌‘लूक आऊट‌’ नोटीस जारी करत कल्पना खरातचा देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्नही हाणून पाडला आहे.

Pratibha Chakankar
Rahuri House Theft Case: राहुरीत भरदिवसा घरफोडी; लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास

तिने अटकपूर्व जामीनासाठी राहाता कोर्टात वकीलामार्फत अर्ज दाखल केला असून त्यावर आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, चाकणकर नावाची चार खाती समता पतसंस्थेत असून त्या खात्यांना भोंदू खरात नॉमिनी असल्याचे समजते. या चार खात्यातून 2 कोटी 40 लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या खात्याची पडताळणी करण्याकरीता पोलिसांनी चाकणकर यांना नोटीस बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.

Pratibha Chakankar
Rahuri Bypoll Candidates: राहुरी पोटनिवडणूक: 7 जणांची माघार; 15 उमेदवार रिंगणात

राहाता न्यायालयाकडे पोलिसांची फेरतपासाची मागणी

शिर्डी संस्थानचा कर्मचारी विकास दिवटे यांच्या आत्महत्येच्या फेरतपासासाठी राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलिसात अर्ज केला आहे. त्यानुसार, गुरुवारी शिर्डी पोलिसांनी राहाता न्यायालयात या प्रकरणाच्या फेर तपासाची मागणी केली आहे. त्यावर एक-दोन सुनावणी होऊन, त्यानंतर न्यायालयाकडून गरजेनुसार (फेरतपासाचे) आदेश काढले जाऊ शकतात, असेही सांगितले जाते.

मुख्यमंत्र्यांना पोलिसांकडून ‌‘अपडेट‌’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी बीड दौऱ्यावर होते. बीडकडे जाण्यासाठी ते शिर्डी विमानतळावर आले. त्यावेळी तेथे उपस्थित नगर पोलिसांनी ‌‘शिर्डीत दाखल खरात प्रकरणाच्या गुन्ह्याची‌’ तपासाचे अपडेट दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news