Rahuri Bypoll Candidates: राहुरी पोटनिवडणूक: 7 जणांची माघार; 15 उमेदवार रिंगणात

विविध पक्षांसह 12 अपक्ष मैदानात; आज माघारीनंतर स्पष्ट होणार अंतिम चित्र
Elections Voting
Elections VotingPudhari
Published on
Updated on

राहुरी: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत बुधवारी अर्ज माघारीच्या दुसऱ्या दिवशी 7 जणांनी माघार घेतली. आता निवडणूक रिंगणात 15 इच्छुक उमेदवार असून आज गुरुवारी (दि.9) माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Elections Voting
Abhishek Kalamkar Case: माजी महापौर अभिषेक कळमकरविरोधात आणखी एक अत्याचाराचा गुन्हा

भाजप आ. शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. 30 इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यातील सात अर्ज छाननीत बाद झाले तर एकाने पहिल्याच दिवशी माघार घेतली. बुधवारी माघारीच्या दुसऱ्या दिवशी आणखी 7 इच्छुकांनी माघार घेतली. त्यामुळे रिंगणात आता 15 इच्छुक राहिले आहेत.

Elections Voting
Ahilyanagar Encroachment Removal Drive: कापड बाजारातील अतिक्रमणांवर कारवाई; वाहतुकीला दिलासा

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेत उमेदवारी अर्जच दाखल केला नसला, तरी राष्ट्रवादीने गोविंद मोकाटे या नवख्या चेहऱ्याला संधी दिली. वंचित बहुजन आघाडीनेही संतोष चोळके यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत रंग भरला आहे. याशिवाय उबाठा सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्यासह 12 अपक्ष रिंगणात असल्याने चुरस निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Elections Voting
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचे नवे कारनामे उघड; २० कोटींचे व्यवहार तपासात

यांची माघार

प्रतिमा किशोर देसर्डा, बाळू बाबूराव कोळसे, बिलाल गफूर शेख, शितोळे सुदर्शन लक्ष्मण, सखाहरी शांताराम बर्डे, इम्रान नबी देशमुख, अल्ताफ इब्राहीम शेख यांनी अर्ज माघारी घेतले.

Elections Voting
Rahuri Assembly Bypoll Candidates: राहुरी पोटनिवडणूक: 7 अर्ज बाद, 22 उमेदवार रिंगणात

ॲड. प्रकाश आंबेडकर आज राहुरीत

वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीत ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड प्रकाश आंबेडकर आज गुरुवारी राहुरीत येत असून त्यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news