Rahuri House Theft Case: राहुरीत भरदिवसा घरफोडी; लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास

सडे गावातील घटना; कुटुंब बाहेर असताना चोरट्यांचा डाव, पोलिस तपास सुरू
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

राहुरी: राहुरी तालुक्यातील सडे येथे भरदिवसा घरफोडीचा धक्कादायक प्रकार घडला असून अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Theft
Rahuri Bypoll Candidates: राहुरी पोटनिवडणूक: 7 जणांची माघार; 15 उमेदवार रिंगणात

सडे येथील सदाशिव मारुती गवते (वय 55) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, दि. 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ते व त्यांच्या कुटुंबातील सदस्य गावातील मारुती मंदिरात कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर ते थेट शेतात कामासाठी गेले.दरम्यान, घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी गवते यांच्या घरात प्रवेश केला. घरातील एका डब्यात ठेवलेले सुमारे 3 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यांनी चोरून नेले.

Theft
Abhishek Kalamkar Case: माजी महापौर अभिषेक कळमकरविरोधात आणखी एक अत्याचाराचा गुन्हा

दुपारी सुमारे 2.30 वाजता गवते कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.घरात सर्वत्र शोध घेतल्यानंतर दागिने न मिळाल्याने चोरी झाल्याची खात्री झाल्यावर सदाशिव गवते यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सडे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news