Rahuri Bypoll Election: राहुरी पोटनिवडणुकीत सात उमेदवार रिंगणात; भाजप-राष्ट्रवादीत प्रतिष्ठेची लढत

बंडखोरीमुळे महाविकास आघाडीत फूट; महायुतीत एकीचे दर्शन, 23 एप्रिलला मतदान
Elections Voting
Elections VotingPudhari
Published on
Updated on

राहुरी: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत सात उमेदवार आमने सामने उभे ठाकल्याने भाजप, राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठा, वर्चस्व आणि अस्तित्वाची लढाई रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान आज गुरुवारी (दि.9) माघारीच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी माघार घेतली. शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी बंडाचा झेंडा फडकाविल्याने महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्याचे दिसून आले.

Elections Voting
Fertilizer Price Hike: खत दरवाढीचा फटका; खरीपपूर्वी शेतकरी संकटात

भाजपचे दिवंगत आ. शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत असून 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीपासून अलिप्त भूमिका घेतल्याने सुरुवातीला निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र राष्ट्रवादीने गोविंद मोकाटे या नवख्या चेहऱ्याला उमेदवारी देत राजकीय समीकरण बदलून टाकले. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने चुरस वाढली आहे.

Elections Voting
Rahuri House Theft Case: राहुरीत भरदिवसा घरफोडी; लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास

सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक रावसाहेब खेवरे यांनी राहुरी तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त करत उमेदवारी कायम ठेवली. त्यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीत दुफळी निर्माण झाल्याचे चित्र समोर आले. सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच वंचित आणि अपक्षांनी रंगत भरल्याचे चित्र स्पष्ट झाले.

Elections Voting
Rahuri Bypoll Candidates: राहुरी पोटनिवडणूक: 7 जणांची माघार; 15 उमेदवार रिंगणात

प्राजक्त तनपुरेंच्या भूमिकेकडे लक्ष

माजी मंत्री आणि शरद पवार समर्थक प्राजक्त तनपुरे यांचे मनपरिवर्तन करण्यात भाजपला यश मिळाले. ज्या हेतुसाठी तनपुरे निवडणूक लढविणार होते, त्याबाबत भाजपने सकारात्मकता दर्शविली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तनपुरेंसोबत संवाद साधला. परिणामी तनपुरे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोकाटे यांना उमेदवारी दिली. आता प्राजक्त तनपुरे पक्षनिष्ठेखातर पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार की अलिप्त भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Elections Voting
Abhishek Kalamkar Case: माजी महापौर अभिषेक कळमकरविरोधात आणखी एक अत्याचाराचा गुन्हा

बेकी अन्‌‍ एकीचे दर्शन

महायुतीमधील घटकपक्ष शिवसेनेचे (शिंदे गट) मातब्बर नेते रवींद्र मोरे व राजू शेटे यांची पत्नी सविता यांनी शेवटच्या टप्प्यात अर्ज माघारी घेतले आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना दिलासा मिळाला. महाविकास आघाडीत बेकी तर महायुतीत एकीचे दर्शन माघारीनंतर दिसले.यांची माघार बाळासाहेब सोमा जाधव, नागेश विलास जाधव, अनिल भिकाजी जाधव, नामदेव बंडू पवार, सविता रामचंद्र शेटे, संभाजी लक्ष्मण धोंडे, साहेबराव पाटीलबा म्हसे, रवींद्र बापुसाहेब मोरे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news