Kopargaon Constituency Development: रस्ते अन्‌‍ शिक्षणातूनच विकासाला खरी गती

आ.आशुतोष काळे; माहेगाव देशमुख येथे शाळा खोल्या, रस्ते विकासकामांचे लोकार्पण
Kopargaon Constituency Development
Kopargaon Constituency DevelopmentPudhari
Published on
Updated on

कोळपेवाडी : चांगले रस्ते म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्याचा आत्मविश्वास, तर प्रशस्त, सुरक्षित आणि सुसज्ज शाळा खोल्या म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आहे. त्यामुळे रस्ते आणि शिक्षण विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.

Kopargaon Constituency Development
National Defence Corridor Ahilyanagar: नॅशनल डिफेन्स कॉरिडोरमुळे अहिल्यानगरच्या तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार

कोपरगाव मतदार संघातील माहेगाव देशमुख येथे सचिन खर्डे घर ते ग्रा.मा. 101 रस्ता करणे (50 लाख), जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 03 खोल्या बांधणे (36 लाख) या एकूण 86 लाखाच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 2 खोल्या (24 लाख) या कामाचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

Kopargaon Constituency Development
City Vote Festival: मतदार जागृतीसाठी ‘सिटी वोट फेस्टिवल’; विद्यार्थ्यांमधून लोकशाहीचा संदेश

आ. काळे म्हणाले की, माहेगाव देशमुखच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जुन्या खोल्या जीर्ण झाल्यामुळे दोन नव्या खोल्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. झेडपीच्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेप्रमाणे आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात तसेच शाळेची विद्यार्थी संख्या वाढावी, यासाठी आणखी तीन नव्या खोल्यांसाठी निधी आणला असून त्या खोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या खोल्यांचे कामही उत्कृष्ठ पद्धतीने लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.

Kopargaon Constituency Development
Pathardi Fake Currency: सिनेस्टाईल पाठलाग करून बनावट नोटा प्रकरणातील 10 वर्षांपासून फरार आरोपी अटकेत

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी मिळविण्यात यश मिळाले आहे. या निधीतून रस्ते, वीज, पाणी, आरोग्य अशा विकासाच्या मुलभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. रस्ते व शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत समांतर विकास साधण्यात यश आले असून ही विकासदृष्टी केवळ आजच्या पिढीपुरती मर्यादित नसून पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया घालणारी आहे. विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार रस्ते उपलब्ध असतील तरच विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि वेळेत होणार आहे आणि शाळा चांगली असेल तरच शिक्षण टिकणार आहे.

Kopargaon Constituency Development
Viththalrao Langhe: जनतेच्या कामांत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही – आमदार विठ्ठलराव लंघे

म्हणूनच रस्ते आणि शिक्षण या विकासाच्या दोन वेगवेगळ्या नव्हे तर एकमेकांशी घट्ट जोडलेल्या बाजू आहेत. याच विचारातून मतदार संघात रस्ते आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत एकाच वेळी ठोस कामे केली आहेत. माहेगाव देशमुख येथे सुरू होणारे रस्त्यांचे काम आणि शाळा खोल्यांचे बांधकाम हे केवळ स्वतंत्र प्रकल्प नसून, समग्र विकासाच्या दृष्टीने आखलेले नियोजनबद्ध पाऊल आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध होतील असा विश्वास आ. काळे यांनी यावेळी व्यक्त केला.

Kopargaon Constituency Development
‌Amrutvahini ITI Dubai job: ‘अमृतवाहिनी आयटीआय‌’च्या 6 विद्यार्थ्यांना दुबईतील कंपनीत नोकरी

याप्रसंगी माहेगाव देशमुख ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, श्री अमृतेश्वर महादेव मंदिर, श्री दत्तदिगंबर देवस्थान व श्री मारुती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, विविध क्षेत्रातील मान्यवर व माहेगाव देशमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news