

संगमनेर : माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेतून राज्यात अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी आयटीआयमधील 6 विद्यार्थ्यांची दुबई येथील कंपनीत समाधानकारक पगारावर नोकरीसाठी निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य विलास भाटे यांनी दिली.
दुबईतील जीबीएमटी स्टील सर्विसेस या कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू अमृतवाहिनी आयटीआयमध्ये पार पडला. यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर सतीश खुळे व प्रोडक्शन हेड प्रमोद आवारी उपस्थित होते. ‘इलेक्ट्रिशन’च्या या यशाबद्दल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मॅनेजर प्रा. विवेक धुमाळ, अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य विलास भाटे, नामदेव गायकवाड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
इलेक्ट्रिशियन व फिटर ट्रेडच्या विद्यार्थ्यांचा त्यांनी इंटरव्यू घेतला. 6 विद्यार्थ्यांची मोठ्या पॅकेजवर त्यांनी नोकरीसाठी निवड केली आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूमुळे ‘अमृतवाहिनी’च्या अनेक विद्यार्थ्यांना नोकरीच्या सध्या उपलब्ध होत आहेत. देशाबाहेर अमृतवाहिनी संस्थेने यशाचा झेंडा फडकवला आहे.
संगमनेरः अमृतवाहिनी आयटीआयमधील 6 विद्यार्थ्यांची दुबईस्थित कंपनीने नोकरीसाठी निवड केली. (छायाः शिवाजी क्षिरसागर)