Police Officer Fraud Case: पोलिस अधिकाऱ्याचा विवाहप्रसंग वादग्रस्त! ‌‘ती‌’चा मॅटर मिटविण्यासाठी २० लाखांची उकळी रक्कम

अनैतिक संबंध, फसवणूक, गर्भपात आणि मानसिक छळ — उपनिरीक्षकासह दहा जणांविरोधात शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल
Police Officer Fraud Case
Police Officer Fraud CasePudhari
Published on
Updated on

बोधेगाव: अनैतिक संबंध लपवत थाटामाटात विवाह सोहळा करताना 21 लाखांची वरदक्षिणा घेतली. ‌‘ती‌’चा मॅटर मिटविण्याच्या नावाखाली 20 लाख रुपये उकळले. नंतर मात्र नवविवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला नांदविण्यास नकार देण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक असलेल्या पतीसह सासू, सासरे, तीन नंदा व नंदोई आणि ‌‘ती‌’ महिला अशा दहा जणांविरोधात शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Ahilyanagar News)

Police Officer Fraud Case
Rahuri politics: ‘चाचां‌’च्या बैठकांमुळे राहुरीचे राजकारण तापले!

शेवगाव तालुक्यातील नवविवाहितेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर नंदकिशोर ढाकणे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांचे नाव आहे. सध्या ते रायगड जिल्ह्यात महामार्ग विभागात सेवेत असल्याचे समजते. याशिवाय सासू संगीता नंदकिशोर ढाकणे, सासरे नंदकिशोर रामराव ढाकणे, नणंद मनीषा बाजीराव खेडकर, नंदाई बाजीराव महादेव खेडकर (दोघे रा. जांभळी, पाथर्डी), नणंद सोनाली दत्तात्रय खेडकर, नंदाई दत्तात्रय खेडकर (दोघे रा. चकलंबा, गेवराई), नणंद सारिका गणेश केदार आणि नंदाई गणेश शिवनाथ केदार (दोघे रा. हसनापूर, शेवगाव) आणि गोंदिया जिल्ह्यातील ‌‘ती‌’चा आरोपी म्हणून फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे.

Police Officer Fraud Case
BJP NCP Alliance: डॉ. सुजय विखे पाटील : नेतृत्वाने सांगावे कोणाशी चर्चा करावी!

14 जून 2024 रोजी शेवगाव तालुक्यातीलच तरुणीशी हसनापूर (ता. शेवगाव) येथील रामेश्वर नंदकिशोर ढाकणे यांचा विवाह झाला. विवाहावेळी रामेश्वर ढाकणे हे पोलिस दलात उपनिरीक्षक म्हणून गोंदिया जिल्ह्यात नोकरीला होते. लग्नानंतर नवविवाहित दाम्पत्य फिरण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. तेथे रामेश्वर ढाकणे यांनी अनैतिक संबंधाची माहिती फिर्यादी नवविवाहितेला दिली. मात्र, त्यातून बाहेर पडणार असून, त्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानुसार नवविवाहितेने होकार देत साथ देण्याची ग्वाही दिली. लग्नासाठीच्या सुट्या संपल्यानंतर पती रामेश्वर हे पुन्हा ड्युटीवर गेले. तेथून ते फोनवर ‌‘तू घरी निघून जा, तुला नांदवणार नाही,‌’ असे म्हणत होते. ही बाब सासू, सासऱ्यांना सांगितली असता ते पतीला समजावतो असे म्हणाले. माहेरच्यांनी पतीसह सासू, सासऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते समजून घेण्यापलीकडे गेले होते. उलट नवविवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा मानसिक छळ करण्यात आला.

Police Officer Fraud Case
Highway Potholes: छत्रपती संभाजीनगर महामार्ग झाला ‘बेवारस’! खड्ड्यांनी चाळण, नागरिकांचा संताप

अनैतिक संबंध असतानाही रामेश्वर नंदकिशोर ढाकणे यांनी विवाह करून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सासू संगीता, सासरे नंदकिशोर आणि तीन नणंदा, तसेच त्या तिघींचे पती यांनी संगनमताने लग्न करण्याचा बनाव करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप नवविवाहितेने फिर्यादीत केला आहे.

Police Officer Fraud Case
Shirdi Airport Jobs: शिर्डी विमानतळावर स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीची संधी

21 तोळे सोने गायब

नवविवाहितेने सासूकडे 21 तोळे सोने ठेवण्यासाठी दिले होते. काही दिवसांनी नणंद व तिचा पती घरी आले. त्यांनी ‌‘ती‌’चा मॅटर मिटविण्यासाठी पैसे लागणार असून, सोने गहाण ठेवायचे असे सांगून सासूकडून सोने घेऊन गेले. नवविवाहितेने पतीसोबत संवाद साधत खातरजमा केल्यानंतर सोने दिले. मात्र, हे सोने सासू व नणंदेने अजूनही दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Police Officer Fraud Case
Ashwi Jorve Election Strategy: आश्वी-जोर्वे गटात राजकीय रणसज्जता; विखे आणि थोरात गटात जोरदार मोर्चेबांधणी

वीस लाखांची रोकड उकळली

गावी आलेल्या पतीने ‌‘ती‌’चा मॅटर मिटविण्यासाठी आणखी पैसे लागणार असून, माहेराहून वीस लाख रुपये आणण्याची मागणी केली. नवविवाहितेने वडील, चुलत्यांना सांगून नोव्हेंबर 2024 मध्ये 10 लाख व नंतर डिसेंबर 2024 मध्ये पुन्हा दहा लाख असे वीस लाख रुपये दिले. ही आर्थिक फसवणूक असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Police Officer Fraud Case
Sugarcane Rate Protest: ऊसदर ३५५० रुपये जाहीर करा; अन्यथा साखर कारखान्यांचे धुराडे बंद करण्याचा इशारा

गोळ्याने गर्भपात

नवविवाहितेने पतीला गर्भधारणेची माहिती दिली. आताच मूलबाळ नको, हवं तर गोंदियाला घेऊन जातो असे म्हणत पतीने बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. नणंद व नंदाईने पती सांगतो तसे कर, अशी धमकी दिली. पतीने मानसिक छळ करत मारहाण केली. इच्छा नसताना बळजबरीने गोळ्या खाऊ घालत दोन महिन्यांचा गर्भपात केला. या गर्भपाताला सासू व सासऱ्याची मूक संमती असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Police Officer Fraud Case
Dhanore Leopard Rescue: धानोरेत थरार! जखमी बिबट्या भुलीनंतर अखेर जेरबंद

मदतीची याचना; पण न्याय नाही

पती पोलिस दलात नोकरीस असल्याने नवविवाहितेने मदतीसाठी गोंदियाचे तत्कालीन पोलिस अधीक्षक, महिला आयोग, अहिल्यानगरमधील भरोसा सेल, तसेच महामार्गाचे अपर पोलिस महासंचालकांकडे मदतीची याचना केली, पण यातील कोणीच तिला न्याय देऊ शकले नाही. अखेर नवविवाहितेने शेवगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पण गुन्हा दाखल करण्यासाठी तिला जवळपास दोन महिने हेलपाटे मारावे लागल्याचा आरोप नवविवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news