

नगर तालुका: छत्रपती संभाजीनगर महामार्गाची खूपच दयनीय अवस्था झाली आहे. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी अनेक गालाचे ग्रामस्थ, तसेच विविध सामाजिक संघटनांनी वारंवार मागणी व आंदोलने करूनही प्रशासनाम काहीही परिणाम झाला नाही. महामार्गाच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करून नागरिक, तसेच विविध सामाजिक संघटना थकल्या आहेत. महामार्गावर खड्डयांमुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली अजी. महामार्गाला कोणीच वाली नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. महामार्ग बेबारस झाल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहेत. (Latest Ahilyanagar News)
महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक, विद्यार्थी, महामार्गालगत राहाणारे नागरिक, व्यावसायिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून महामार्गाची दुरवस्था झाली आहे. अहिल्यानगर ते वडाळादरम्यान महामार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पाहावयास मिळते. महामार्गावर सुमारे दोन ते तीन फूट खोल खड्डे पडलेले आहेत. खड्डयांमुळे झालेल्या अपघातात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत, तरीही प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
महामार्गाची दुरवस्था, तसेच खड्ड्यांमुळे ठिकटिकाणी अवजड बाइने नादुरुस्त होत आहेत. तसेच काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. तासन्तास होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, तसेच प्रवाशांना मोता मनःस्ताप सहन करावा लागतो. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासनालाही मोठी कसरत करावी लागते.
खड्यांमुळे महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे, वेळ, इंचन, वाहनांचे नुकसान, अपघात, हाडांचे विविध आजार यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. महामार्ग दुरुस्तीसाठी शेंडी, पोखर्जी, धनगरवाडी, नेऊर, इमामपुर, अहिरवाडी, पांढरीपूल, खोसपुरी, बांजोळी, घोडेगाव यांसह विविय गावच्या ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली आहे. त्याचबरोबर विविध संघटनांनीही महामार्ग दुरुस्तीसाठी मागणी, तसेच आंदोलन केले होते. पांढरीपूल पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रास्ता रोको, तसेच गांधीगिरी करत महामार्गावर बृक्षारोपणही केले होते. तरीही प्रशासनावर काडीमात्र परिणाम झाला नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
महामार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला आणखी किती बळी अपेक्षित आहेत, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. महामार्गाची दुरवस्था झाली असून, नागरिकांची, प्रवाशांची होत असलेली दैना प्रशासनाला दिसत नाही का? प्रशासन यावाचतची चुप्पी साधून आहे. महामार्गाला कोणीच वाली अला नाही का? प्रशासनाकडून सुरू असलेला चालढकलपणा, तसेच अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष यामुळे ग्रामस्थांमध्ये तीज संतापाची लाट निर्माण झाली आहे. नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होऊन तीव्र आंदोलन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महामार्गाची तत्काल दुरुस्ती करून वाहनचालक, नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना होणारा मनःस्ताप दूर करावा, अशी मागणी भाजप युवत मौर्याचे बिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ हारेर, अदिनाथ खंडागळे, आदिनाथ काळे, बाजाभाई शेख, करीम वेग, आसाराम वाघमोडे, बापूसाहेव आव्हाड, बाजीराव आबाते, राजू डारकुंडे, सुनील शिकारे, सोपान आव्हाड यांच्यासह विविध गावच्या ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.
महामार्गालगतच्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महामार्गावर खूपच विदारक चित्र पाहावयास मिळते. प्रशासनाला आणखी किती निष्पापांचे काही हवे आहेत, त्यानंतर जलद गतीने महामार्गाची दुरुस्ती करण्यात येईल.
सोमनाथ हारेर, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा
महामार्गाच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. महामार्गावरून बाहन बालवणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखी आहे, महामार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नागरिकांच्या रोषाचा उद्रेक झाल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल.
चापूसाहेच आव्हाड, माजी सरपंच, पांगरमाल
टोलनाका सुरू करा; परंतु महामार्ग दुरुस्त करा !
टोलनाका सुरू असताना महामार्ग सुस्थितीत होता. परंतु टोलनाका बंद झाल्यानंतर महामार्गाची अत्यंत दयनीय अबस्था झाली आहे. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे टोलनाका सुरू करा; पण महामार्ग दुरुस्त करा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.