District Bank Chairman Election: जिल्हा बँकेत सत्तांतराची चिन्हे? चेअरमन निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग

अजित पवार गटाचे पारडे जड की भाजपचा दावा कायम? नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निवड प्रक्रिया शक्य
District Bank
District BankPudhari
Published on
Updated on

नगर: जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या संचालकपद तसेच ‌‘चेअरमन‌’पदाच्या निवडीसाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी उर्वरित चार महिन्यांसाठी बँकेचे नूतन चेअरमन निवडीवरून संचालक मंडळात मतमतांतरे सुरू असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे उदय शेळके यांच्या निधनानंतर झालेल्या चेअरमन निवडीत नाट्यमय घडामोडी घडून बँकेत सत्तांतर घडले, तसेच आताही काही घडणार का, याविषयी अंदाज बांधले जात आहेत.

District Bank
Leopard Attack: निंबळक शिवारात बिबट्याचा हल्ला; आठ वर्षांचा मुलगा गंभीर

नूतन चेअरमन ठरविताना विखे पाटलांची भूमिका निर्णायक आहे. मात्र, संचालकांचे संख्याबळ पाहता अजित पवार गटाचे पारडेही तितकेच जड असून, त्यांनी ठरवले तर जिल्हा बँकेची सत्ता पुन्हा राष्ट्रवादी ताब्यात घेऊ शकते. त्यामुळे राजकीय घडामोडींकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.जिल्हा बँकेची 2021 मध्ये 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. राजकीय मातब्बरांनी कार्यकर्त्यांची नव्हे तर ही स्वतःची निवडणूक असल्याने मतभेद विसरून विरोधकांशीही समझोता केला. त्यासाठी राजकीय पक्षांचे जोडेही बाजूला ठेवून सोयीचे राजकारण केले.

District Bank
Municipal Election: शेवगावमध्ये उमेदवारीवरून धाकधूक; बंडखोरीचे वारे, गटबाजीचे राजकारण तापले

राजकीय समझोता एक्सप्रेस

पाच वर्षांपूर्वी विखे गटाचे अमोल राळेभात यांना निवडून आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आपल्या उमेदवाराला माघार घ्यायला लावल्याचे दिसले. अकोल्यातून पिचडांची साथ सोडून सीताराम गायकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून अमित भांगरेंसाठी पिचडांनी माघार घेतली होती. कोपरगावात विवेक कोल्हे यांच्याविरोधात त्यांचे कट्टर विरोधक असूनही आमदार आशुतोष काळे यांनी उमेदवारच दिला नाही; तर कोल्हेदेखील आ. आशुतोष काळेंंच्या विरोधात उमेदवार देण्याच्या भानगडीत पडले नाहीत. श्रीरामपुरातून करण ससाणे आणि भानुदास मुरकुटे यांनी गळ्यात गळे घालून बँकेत बिनविरोध प्रवेश केला. पाथर्डीतील भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात चंद्रशेखर घुलेंनीही फार डोके लावले नाही. त्या बदल्यात घुले यांच्या विरोधातही राजळेंनी ‌‘सोधा‌’ नियम पाळला. राहात्यातून माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांना थोरातांनी विरोध न केल्याने विखेंनीही संगमनेरातून कानवडे यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. राहुरीतून अरुण तनपुरेंनाही विरोध केला नाही, शिवसेनेचे शंकरराव गडाख हेदेखील शेवटच्या क्षणी बिनविरोध झाले. मात्र, शिवाजीराव कर्डिले, ॲड. उदय शेळके यांच्यासह चार उमेदवारांना निवडणुकीला सामोरे जावे लागले होते.

District Bank
Minor Marriage Case: अकोल्यात एकाच दिवशी दोन अल्पवयीन विवाह उघडकीस; पोलिसांत गुन्हे दाखल, विभागाच्या कामकाजावर प्रश्न

शेळके, कर्डिलेंच्या निवडीचा फ्लॅशबॅक

चेअरमनपद राष्ट्रवादी आणि व्हा. चेअरमनपद काँग्रेसकडे असा फॉर्म्यूला ठरला. चेअरमन म्हणून ॲड.उदय शेळके तर व्हा. चेअरमनपदी माधवराव कानवडे यांची निवड करण्यात आली. दरम्यान, उदय शेळके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी निवडणूक झाली. यात राष्ट्रवादीचे नेते चंद्रशेखर घुले यांच्याकडे कागदावर संख्याबळ होते 14. आदल्या दिवशी अजित पवार आणि थोरातांनी संचालकांची बैठकही घेतली होती. मात्र निवडीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. घुलेंनी गृहीत धरलेली चार मते फुटली. त्यामुळे भाजपचे शिवाजीराव कर्डिले एका मताने विजयी झाले. घुलेंना 9 आणि कर्डिलेंना 10 मते मिळाली. एक मत बाद झाले.

District Bank
Leopard Attack: बिबट्याचा हल्ला अतिशय गंभीर! खारेकर्जुनेच्या चिमुरडीच्या मृत्यूने गाव संतप्त; बंद आंदोलन पेटले

भाजपने दावा सोडला तरच..!

आज भाजपकडे 7, राष्ट्रवादीकडे 7 आणि शिंदे गटाकडे 1 असे एकूण 15 संचालक आहेत. मविआकडे 6 संचालक आहेत. जिल्ह्याची, कारखानदारांची आर्थिक नाडी असलेली बँक ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा आग्रही असल्याचेही विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मात्र, त्यासाठी भाजपने दावा सोडणे गरजेचे आहे.

आजचा राजकीय विचारप्रवाह

  • भाजप (7): विवेक कोल्हे, मोनिका राजळे, अण्णासाहेब म्हस्के, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, आशा तापकीर

  • शिवसेना (1): भानुदास मुरकुटे

  • राष्ट्रवादी (7): सीताराम गायकर, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अनुराधा नागवडे

  • राष्ट्रवादी (शप) (2) : अमित भांगरे, गीतांजली शेळके

  • काँग्रेस (3): माधवराव कानवडे, करण ससाणे, गणपतराव सांगळे

  • शिवसेना उबाठा (1): शंकरराव गडाख

District Bank
Shrirampur Municipal Election: श्रीरामपुरात एकच उमेदवारी अर्ज; पक्षनिर्णयांवर अजूनही अनिश्चितता

विखे-थोरातांचा कस लागणार

जिल्हा बँकेत कर्डिले यांचे नेतृत्व सर्वमान्य होते. मात्र, त्यांच्यानंतर बँकेची सूत्रे कोणाच्या ताब्यात दिली जावीत, याविषयी कारखानदार संचालकांमधून विविध मतप्रवाह आहेत. चेअरमन निवडीसाठी अजित पवारांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्यास विखे यांच्या विरोधात जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांचे संचालक थोरात यांच्या नेतृत्वात जुळवाजुळव करू शकतात, अशी चर्चा आहे. थोरातांकडे मविआचे पक्षीय पातळीवर 6 संख्याबळ असले, तरी त्यांना मानणारे साधारणतः 13 संचालक असल्याचेही खासगीत बोलले जाते. थोरात विरोधात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये सत्तेचे गणित जुळविताना संघर्ष दिसू शकतो. त्यामुळे या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.

District Bank
Municipal Tax Recovery Ahilyanagar: महापालिकेचे ‘45 कोटी वसुली’ टार्गेट; थकबाकीदारांच्या भूखंडावर जप्तीची तयारी

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निवड शक्य

जिल्हा बॅंकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन व संचालक निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा घेऊन त्यात निवडी करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी दिले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही निवड प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते, असा अंदाज आहे.

चेअरमनपदासाठी प्रमुख नावे

भाजपकडून अण्णासाहेब म्हस्के यांचे नाव आघाडीवर आहे. विवेक कोल्हे यांनाही सुखद धक्का दिला जाऊ शकतो. तसेच अजित पवार गटातून आशुतोष काळे यांच्यासह सीताराम गायकर, राहुल जगताप, अरुण तनपुरे यांचीही नावे चर्चेत आहेत. याशिवाय ऐनवेळी अन्य नावांचाही विचार होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news