Municipal Election: शेवगावमध्ये उमेदवारीवरून धाकधूक; बंडखोरीचे वारे, गटबाजीचे राजकारण तापले

पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष; भाजपमध्ये पेच, राष्ट्रवादीत गटबाजी, शिवसेनेत उत्सुकता वाढली
Municipal Election
Municipal ElectionPudhari
Published on
Updated on

बाळासाहेब खेडकर

बोधेगाव: शेवगाव नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 10पासून सुरू झाली आहे, तरीही कोणत्याही प्रमुख पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा न केल्याने शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. इच्छुक उमेदवारांची लगबग, गुप्त बैठका आणि चर्चांचा भडका यामुळे शेवगावचे राजकारण अक्षरशः धगधगत आहे.

Municipal Election
Minor Marriage Case: अकोल्यात एकाच दिवशी दोन अल्पवयीन विवाह उघडकीस; पोलिसांत गुन्हे दाखल, विभागाच्या कामकाजावर प्रश्न

या वेळी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने राजकीय पक्षांमध्ये महिलांची स्पर्धा प्रचंड वाढली आहे. भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी रत्नमाला महेश फलके, माया अरुण मुंढे, सुजाता सागर फडके, राणी मोहिते, निर्मला लांडे, डॉ. गीता लांडे, नंदा कोरडे, दीप्ती गांधी आणि सविता दहिवाळकर आदींची नावे चर्चेत आहेत. नगरसेवक पदासाठीही शेकडो इच्छुकांनी पक्ष कार्यालयात धाव घेतली असून, मुलाखतींना मोठी गर्दी केली आहे.

Municipal Election
Leopard Attack: बिबट्याचा हल्ला अतिशय गंभीर! खारेकर्जुनेच्या चिमुरडीच्या मृत्यूने गाव संतप्त; बंद आंदोलन पेटले

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) विद्या लांडे, यमुनाबाई ढोरकुळे आणि यास्मीन शेख यांच्या नावांची चर्चा आहे. शरद पवार गट ः स्नेहा भारदे, परविन काझी, स्वाती रासने, नजमा पठाण आणि तरनुम शेख या महिला स्पर्धेत उतरल्या आहेत. दोन्ही गटांत वर्चस्वाच्या संघर्षामुळे गटबाजी उफाळली आहे. शिवसेना (शिंदे गट)कडून राजश्री डहाळे, स्वाती आघाट, विद्या गाडेकर या नावांचा उल्लेख होत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून सुनीता चव्हाण आणि गैबुन्निसा शेख मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. भाकप व काही अपक्ष गटदेखील सज्ज असून, बंडखोरीला खतपाणी घालण्याच्या हालचाली गुपचूप सुरू आहेत.

Municipal Election
Shrirampur Municipal Election: श्रीरामपुरात एकच उमेदवारी अर्ज; पक्षनिर्णयांवर अजूनही अनिश्चितता

मागील कार्यकाळात नगरपरिषदेवर सत्ता गाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षात उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण झाला आहे. वरिष्ठ नेते आपल्या गोटातील कार्यकर्त्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी हालचाली करत असल्याने अनेक आजी-माजी नगरसेवक असंतुष्ट आहेत. काही नाराज नेते तिकीट न मिळाल्यास थेट बंडखोरीचा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत आहेत. भाजप या वेळी मराठा कार्ड खेळणार की ओबीसीला संधी देणार? हा निर्णयच आगामी नगराध्यक्षपदाचे चित्र ठरवणार आहे, असे राजकीय जाणकार सांगतात.

शहरभर उमेदवारीच्या अफवा पसरल्या आहेत. काही इच्छुकांनी अपक्ष तयारी सुरू केल्याचे समजते. पक्षांतर्गत नाराजी एवढी वाढली आहे की एका प्रभागात तीन गट असे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. नेते बदलले, पण शहराचा विकास ठप्पच आहे. रस्ते खड्ड्यात, गटारे ओसंडून वाहतात, तर नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. अशी स्थिती सध्या पहावयास मिळत आहे. निवडणुकीच्या रिंगणात घोषणांचा पाऊस पडतो, पण जनतेवर आजही समस्यांचा मारा सुरूच आहे.

Municipal Election
Municipal Tax Recovery Ahilyanagar: महापालिकेचे ‘45 कोटी वसुली’ टार्गेट; थकबाकीदारांच्या भूखंडावर जप्तीची तयारी

प्रतापराव ढाकणे, तालुकाध्यक्ष हरीश भारदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नगरपरिषद निवडणुकीसाठी संघटन मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले. स्थानिक स्तरावर ढाकणे गटाचे कार्यकर्ते निवडणूक रिंगणात पुन्हा जोमात उतरल्याने प्रतिस्पर्ध्यांना गटांत खळबळ उडाली आहे. भाजपकडून मोनिका राजळेंचा निर्धार, अजित पवार गटाचे घुले यांचा आत्मविश्वास आणि शरद पवार गटाचे प्रतापराव ढाकणे यांचा नव्याने उफाळलेला जोश या तिहेरी संघर्षामुळे शेवगाव नगरपरिषद निवडणूक राजकीय रणसंग्रामात परावर्तित होण्याची चिन्हे आहेत. आगामी काही दिवसांत पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या घोषणेसोबतच शेवगावमध्ये राजकारणाचा तापमान वाढणार हे निश्चित झाले आहे.

Municipal Election
Municipal Election Campaign Rates: बिर्याणी 150, तर मांसाहारी फ्लेट 240 रुपयांना; पालिका प्रचार साहित्याचे दर निश्चित

उमेदवारीपेक्षा बंडखोरीचं राजकारण तापलं!

सध्या शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारीपेक्षा गटबाजी आणि बंडखोरीची चर्चा जास्त रंगली आहे. सर्वांचे लक्ष पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागले आहे. वेळेत ठोस भूमिका न घेतल्यास पक्षालाच मोठा फटका बसू शकतो, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

Municipal Election
Leopard Attack Khare Karjune: खारे कर्जुने येथे बिबट्याचा हल्ला; चिमुरडीला उचलून नेल्याने ग्रामस्थांत भीतीचं वातावरण

ढाकणेंच्या सक्रियतेमुळे नवी कलाटणी

शेवगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे. भाजपच्या आ. मोनिका राजळे यांनी आपला पक्ष पुन्हा सत्तेत आणण्यासाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे माजी आ. चंद्रशेखर घुले, माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनीही नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण खरी चर्चा रंगली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते प्रतापराव ढाकणे यांच्या हालचालींवर! काही दिवसांपूर्वी ढाकणे भाजपत प्रवेश करणार अशी चर्चेची वादळे उठली होती. मात्र, त्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी नुकतीच शरद पवार गटाची मोठी बैठक घेऊन आपला पक्षनिष्ठतेचा झेंडा उंचावला. ढाकणे यांच्या पुनःसक्रियतेमुळे शेवगावच्या राजकीय समीकरणात नवा कलाटणीबिंदू निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news