नाशिक : कासारवाडीत विहिरीत पडला, मोहदरी घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

नाशिक : कासारवाडीत विहिरीत पडला, मोहदरी घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथे विहिरीत अंदाजे दीड वर्ष वयाचा बिबट्या पडल्याची घटना गुरुवारी (दि. 21) सकाळी उघडकीस आली. कासारवाडी सावजाच्या पाठीमागे धावताना विहिरीचा अंदाज न आल्याने बिबट्या विहिरीत पडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भागिनाथ साळुंखे यांच्या विहिरीत हा बिबट्या पडलेला आढळून आला.

याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली असून परिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी कासारवाडी येथे पोहोचले आहेत. बिबट्याचा बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत

संबधित बातम्या :

दरम्यान दुसरीकडे, नाशिक- पुणे महामार्गावर मोहदरी घाटाच्या सुरुवातीलाच अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्युमुखी पडल्याची दुसरी घटना बुधवारी रात्री च्या सुमारास घडली. बिबट्या रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. त्याला माळेगाव मोहदरी वनोद्यांना आणले असून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news