नाशिक : अपघातानंतर पळून गेला, रिक्षाचालकाला न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दाम्पत्याला धडक देऊन पसार होणाऱ्या रिक्षाचालकाला न्यायालयाने सहा हजार रुपयांचा दंड आणि न्यायालय उठेपर्यंत शिक्षा सुनावली. बाळू खंडू कांबळे (रा. वडाळा गाव) असे रिक्षाचालकाचे नाव आहे.

अशोक जेजूरकर हे दि. १८ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून तपोवन रोडने काठे गल्लीच्या दिशेने जात होते. त्यावेळी बाळू कांबळेने रिक्षा निष्काळजीपणे चालवत जेजूरकर यांच्या दुचाकीला धडक दिली हाेती. त्यात जेजूरकर दाम्पत्य जखमी झाले होते. जखमींना मदत करण्याऐवजी अपघातानंतर कांबळेने पलायन केले होते. गस्तीवरील पोलिस हवालदार सुकदेव माळोदे व शिपाई प्रदीप घागरे यांनी जेजूरकर यांना रुग्णालयात दाखल केले होते. भद्रकाली पोलिस ठाण्यात कांबळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस हवालदार रामदास विंचू यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. विद्या देवरे-निकम यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार गुन्हा शाबित झाल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. चापळे यांनी कांबळे याला सहा हजार १०० रुपयांचा दंड व न्यायालय उठेपर्यंत शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस शिपाई प्रशांत जेऊघाले यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news