नाशिक : खड्डा चुकवण्यास गेला अन् जीव गमावून बसला, वडनेरभैरव येथील घटना | पुढारी

नाशिक : खड्डा चुकवण्यास गेला अन् जीव गमावून बसला, वडनेरभैरव येथील घटना

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

वडनेरभैरव – शिरवाडे वणी रस्त्यावरील खड्डा चुकवताना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेला दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. स्कूल बस-दुचाकीमध्ये ही जोरदार धडक झाली. धडकेत गंभीर जखमी दुसऱ्या विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

संबधित बातमी :

वडनेरभैरव येथील चेतन रवींद्र निकम व तेजस संजय निकम हे मोहाडी माध्यमिक विद्यालयात १२ वी आयटीआयमध्ये शिकत आहेत. ते दोघे शुक्रवारी (दि. १५) दुचाकीने सकाळी ७ च्या सुमारास वडनेरभैरव येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या बहीण हर्षदा निकम हिला घेऊन गावाच्या दिशेने निघाले होते. आपल्या बहिणीला नेहमीप्रमाणे बस थांबा येथे सोडून ते दोघे भाऊ मोहाडीकडे जात होते. त्यावेळी वडनेरभैरव-शिरवाडे वणी रस्त्यावरील खड्डा चुकवताना समोरून येणाऱ्या वडनेरभैरव महाविद्यालयाच्या स्कूल बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील चेतन व तेजस हे दोघे रस्त्यावर पडले. यात चेतनच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर तेजस हा गंभीर जखमी झाला. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button