नाशिक : जिल्ह्यातील ३६५ पैकी १६३ बंधारे ओ‌व्हरफ्लो

नाशिक : जिल्ह्यातील ३६५ पैकी १६३ बंधारे ओ‌व्हरफ्लो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने रोजगार हमी योजनेला चांगले यश मिळाले आहे. यंदा झालेल्या पावसामुळे ४६७ दलघफू पाणीसाठा झाला आहे. या वर्षात रोजगार हमी योजनेतून ३६५ बंधारे मंजूर केले असून, त्यातील १६३ बांधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांपैकी ५२ बंधाऱ्यांमध्ये मागील आठवड्यातील पावसामुळे पाणीसाठा झाला आहे.

संबधित बातम्या

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना तसेच ९०:१० प्रमाण असलेल्या सार्वजनिक कामांच्या योजनांची संख्या वाढल्यामुळे रोजगार हमी योजनेसाठी ठरवलेले ६०:४० चे प्रमाण राखण्यात अडचणी येत असतानाच नाशिक जिल्हा परिषदेने मिशन भगीरथ ही जलसंधारणाची योजना तयार करून त्याची एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू केली. मात्र, या योजनेतील कामांसाठी ९०:१० चे कुशल-अकुशलचे प्रमाण ठरवले. परिणामी जिल्ह्यातील कुशल-अकुशलचे ६०:४० चे प्रमाण बिघडले. त्यामुळे जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनी जिल्हा परिषदेला रोजगार हमी योजना राबवताना कुशल-अकुशल प्रमाण राखण्याच्या सूचना दिल्या होत्या.

रोजगार हमी योजनेतील ३६५ बंधाऱ्यांची कामे सुरू असून, त्यापैकी १५२ कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी सुरुवातीपासून पाऊस कमी असल्याने कामे पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी आले नव्हते. मागील आठवड्यात झालेल्या पावसाने निर्माण झालेल्या पाणीसाठ्यामुळे लगतच्या शेतीला सिंचनासाठी उपयोगी पडणार आहे.

– डॉ. अर्जुन गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news