धुळे : रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जाळून खाक | पुढारी

धुळे : रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जाळून खाक

धुळे: पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या जिन्स कॉर्नर या रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कपड्यांचा माल जळाल्याची घटना घडली आहे. विशेषत: आग लागलेल्या दुकानाच्या शेजारीच फटाक्याचे दुकान असल्यामुळे वेळीच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या संदर्भात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे

शहरातील मुख्य बाजारपेठेत फुलवाला चौक परिसरामध्ये जिन्स कॉर्नर हे दुकान आहे. या दुकानाच्या बाजूलाच मोठे होलसेल फटाक्यांचे दुकान आहे. सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने आग बाजूच्या दुकानापर्यंत पोहचली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जिन्स कॉर्नर दुकानाला भीषण आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली. आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी दुकानाचे शटर उघडून पाहणी केली असता आग ही दुकानाच्या तळमजल्याला लागली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे दुकानात असलेल्या कपडे आणि फर्निचरमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. कर्मचा-यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझविण्यात यश मिळविले. घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत या आगीत दुकानातील लाखों रूपयांचा माल जळून खाक झाल्याने दुकान मालकावर मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेस अनियमित दाबाचा होणारा विद्युत पुरवठा कारणीभूत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

हेही वाचा:

Back to top button