Go First Ticket : 'गो फर्स्ट' विमान कंपनीला तिकीट विक्री थांबविण्याचे डीजीसीएचे आदेश | पुढारी

Go First Ticket : 'गो फर्स्ट' विमान कंपनीला तिकीट विक्री थांबविण्याचे डीजीसीएचे आदेश

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या ‘गो फर्स्ट’ (Go First) विमान कंपनीला हवाई वाहतूक महासंचलनालयाने (DGCA) तिकीट विक्री  तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. गो फर्स्टने गेल्या आठवड्यात दिवाळखोरीसाठी एनसीएलटीकडे अर्ज सादर केला होता. तर येत्या 15 मे पर्यंत तिकीट विक्री थांबवली होती.

ज्या प्रवाशांना (Go First Ticket)  तिकीटे जारी करण्यात आलेली आहेत, त्यांना रिफंड करण्याचे आदेश डीजीसीएने ‘गो फर्स्ट’ ला दिले होते. दुसरीकडे एअरक्राफ्ट रुल्स 1937 अंतर्गत कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती. यावर 15 दिवसांत उत्तर सादर करु, असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. दरम्यान पुढील आदेशापर्यंत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अशा सर्व स्वरुपाची तिकीट विक्री थांबविण्यात यावी, असे डीजीसीएने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button