Adipurush : प्रभासच्या चाहत्यांसाठी खूशखबर! यादिवशी येणार ट्रेलर | पुढारी

Adipurush : प्रभासच्या चाहत्यांसाठी खूशखबर! यादिवशी येणार ट्रेलर

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता प्रभासचा चित्रपट आदिपुरुषची आतुरतेने वाट पाहत आहेत. (Adipurush ) हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. रामायणावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चाहत्यांना त्याच्या ट्रेलरचीही उत्सुकता आहे. आदिपुरुषचा ट्रेलर कधी रिलीज होणार हे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. (Adipurush )

आदिपुरुष हा २०२३ च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. निर्मात्यांनी जाहीर केले आहे की, चित्रपटाचा ट्रेलर ९ मे २०२३ रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित केला जाईल. टीमने प्रभासचे नवीन पोस्टर शेअर केले आहे.

स्क्रीनिंग कुठे होईल?

यूएसए, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आशिया, दक्षिण आशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, फिलीपिन्स, म्यानमार, श्रीलंका, जपान, आफ्रिका, यूके आणि रशिया आणि इजिप्तसह युरोपमध्ये ट्रेलर स्क्रीनिंग होईल.

Back to top button