नाशिक : शहरातील २०० रुग्णालायांवर होणार कारवाई ; पाणी, वीज कापणार | पुढारी

नाशिक : शहरातील २०० रुग्णालायांवर होणार कारवाई ; पाणी, वीज कापणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वेळोवेळी मुदतवाढ देऊन देखील फायर ऑडिटकडे पाठ फिरवणाऱ्या शहरातील दोनशे रुग्णालयांवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. अग्निशमन विभागाने सर्व विभागीय अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती प्राप्त होताच संबंधित रुग्णालयांचे वीज, नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाणार आहे.

आगीच्या घटना टाळ्ण्यासाठी महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम अंतर्गत महापालिका हद्दीतील शासकीय, निमशासकीय कार्यालये, हॉटेल्स, रेस्टॉरंट, रुग्णालये इमारती, बहुमजली शाळा, महाविद्यालय, शॉपींग कॉम्प्लेक्स, मॉल्स, क्लासेस चालकांनी अग्निप्रबंधक उपाययोजना करण्यासाठी फायर ऑडीट करणे आवश्यक आहे. शहरातील खासगी रुग्णालयांनी फायर ऑडीट करुन घेणे बंधनकारक असताना तब्बल चारशे रुग्णालयांनी याकडे डोळेझाक केल्याचे चित्र होते. यानंतर पालिकेच्या अग्निशमन विभागाने नोटीस काढत २० मार्चची मुदतवाढ दिली. फायर ऑडीट न केल्यास रुग्णालयाचे वीज कनेक्शन व पाणी तोडण्याचा इशारा दिला होता.

यानंतर काही रुग्णालयांचे फायर ऑडीट करुन घेतले. मात्र ६२५ पैकी दोनशेहून अधिक रुग्णालयांनी ऑडीटकडे पाठ फिरवली. मुदत संपूनही फायर ऑडीट न करणाऱ्या रुग्णालयांची लिस्ट तयार करण्याचे काम सुरु आहे. अंतिम लिस्ट तयार झाल्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या परिसरातील रुग्णालयाची माहिती देण्यात येइल. त्यानंतर रुग्णालयाअर कारवाइ करण्यात येणार आहे. कारवाइ होण्याच्या भीतीने फायर ऑडीट न केलेल्या रुग्णालयांनी तीन महिन्यांची मुदतवाढ मागितली असली तरी त्यास नकार देण्यात आला आहे.

दोनशे रुग्णालयांनी फायर ऑडीट केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या रुग्णालयाचे पाणी, वीज कनेक्शन तोडण्यात यावे असे पत्र विभागीय अधिकाऱ्यांना पाठवले जाणार आहे.

-संजय बैरागी, अग्नीशमन मुख्य अधिकारी, मनपा

हेही वाचा : 

Back to top button